नंदुरबार- “शिवशाहीर स्व.बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर केवळ व्याख्यान दिले नाही तर जगातील शिवप्रेमींच्या मनामनात पोहचवलं” असे प्रतिपादन शहादा येथील डॉ.पुष्कर शास्त्री यांनी आज स्व.बाबासाहेब पुरंदरे श्रद्धांजली सभेत बोलताना केले.
अ.भा.साहित्य परिषद, श्री जी वाचनालय, शिवशंभू प्रतिष्ठान नंदुरबारच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे आज दि.२६ नोव्हेंबर रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शहादा येथील विकास हायस्कूल मधील प्रा.डॉ.पुष्कर शास्त्री बोलत होते. स्व.बाबासाहेबांच्या जीवन कार्याचे अनेक पैलू त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ.भा.साहित्य परिषदेचे शशिकांत घासकडबी यांनी केले. यावेळी त्यांनी अ.भा साहित्य परिषदेच्या कार्याची माहिती दिली तसेच बाबासाहेबांच्या काही आठवणी सांगितल्या.
या प्रसंगी प्रा.पंकज पाठक, सौ.कल्याणी डांगे, प्रा.सौ.वर्षा घासकडबी यांनी देखील त्यांच्या सहवासातील काही आठवणींना उजाळा दिला. येथील श्रीजी वाचनालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी स्व बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण व बाबासाहेबांच्या ग्रंथांचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीजी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप चौधरी,जेष्ठ साहित्यिक प्रभाकर भावसार, ग्रंथपाल सौ.ऋता चौधरी आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत खेडकर यांनी केले. पत्रकार दीपक कुळकर्णी, संतोष पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. शहरातील अनेक शिवप्रेमी नागरिक , पत्रकार कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी स्व.बाबासाहेब पुरंदरे, तळोदा येथील ग्राहक पंचायतीचे स्व.मार्तंडराव जोशी तसेच २६/११ मधील शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
खूप छान धन्यवाद 🙏