शिवोपासनेची वैशिष्ट्ये आणि शास्त्र
शिवभक्त महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची श्रद्धापूर्वक उपासना करतात. शास्त्र समजून शिवोपासना केल्यास उपासकाला जास्तीत जास्त लाभ होतो. शिवभक्तांना महाशिवरात्रीचा पुरेपूर लाभ व्हावा ‘यासाठी शिवाच्या उपासनेची वैशिष्ट व त्यामागील शास्त्र जाणून घेऊया.
* महाशिवरात्रीचे व्रत करण्यामागील कारण व फलश्रुती – रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो त्या प्रकाराला महाशिवरात्री म्हणतात. या काळात शिवाचे सगुणातील कार्य थांबते. म्हणजे शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो. तेव्हा शिव विश्वातील तमोगुण स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वात तमोगुण वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून महाशिवरात्रीचे व्रत करावे. हे व्रत काम्य आणि नैमित्तिक अशा दोन प्रकारे केले जाते. या व्रतामध्ये उपवास, पूजा आणि जागरण हे तीन अंगे आहेत.
व्रताची फलश्रुती – शिवाने स्वतः भक्तांना आशीर्वचन दिले आहे, ‘जे महाशिवरात्रिला माझे व्रत करतील त्यांच्यावर माझी पुढील प्रमाणे कृपादृष्टी होईल –
१) पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील .
२) कुमारिकांना मनासारखा वर मिळेल.
३) विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल.’
* भस्म याचा भावार्थ – ‘शरीर नाशवंत आहे’, याचे स्मरण सतत राहण्याचे प्रतीक म्हणजे भस्म. रुद्राक्ष याचा अर्थ रुद्राक्ष हे बीज आहे ते केव्हाच क्षीण होत नाही आत्माही तसाच आहे. रुद्राक्ष हे आत्म्याचे प्रतीक आहे
* शृंग दर्शन – नंदीच्या शिंगा मधून शिवपिंडी पाहणे याला शृंगदर्शन म्हणतात. प्रदर्शनाच्या वेळी नंदीच्या उजव्या अंगाला मागील पायाजवळ बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या पुरूणावर ठेवावा उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा हे नंदीच्या दोन शिंगावर ठेवावेत. दोन्ही शिंगे व त्यावर ठेवलेले दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवपिंडी निवडावी.
* शिवाला बेल कसा वाहावा ? – शिवतत्त्व अधिकाधिक आकृष्ट करून घेण्याची क्षमता असल्यामुळे शिवाला बेल वाहतात. तारक उपासनेसाठी शिवाला बेल पत्र वाहतांना ते पिंडीवर उपडे ठेवून त्याचे देत पिंडी कडे आणि अग्र टोक आपल्याकडे येईल अशा रितीने वहावे. बेलाचे पान शिव पिंडीवर उपडे झाल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होऊन भाविकाला त्याचा अधिक लाभ होतो.
* महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचा नामजप का करावा ? महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा हजार पटीने कार्यरत असते. त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी ‘ओम नमः शिवाय’ हा जप जास्तीत जास्त करावा. शिवपुजेतील काही विधिनिषेध पांढऱ्या अक्षदा आणि फुले वाहा. अक्षदांकडे निर्गुण ईश्वरी तत्त्वांशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षिले जातात म्हणून अधिकाधिक निर्गुणाची संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढऱ्या रंगाची साधर्म्य असलेल्या पांढऱ्या रंगाच्या अक्षदा वाहाव्या. त्याच प्रमाणे शाळुकेला निशिगंध, जाई जुई, मोगरा यासारखी पांढरी फुले 10 च्या पटीत त्यांचे देठ पिंडी कडे करून वहावीत. उदबत्ती आणि अत्तर यातून प्रक्षेपित होणार्या लहरिंकडे देवतांच्या लहरी लवकर आकृष्ट होतात. म्हणून शिवपूजेत केवडा, चमेली किंवा हिना या शिवाला प्रिय असणाऱ्या गंधाच्या उदबत्त्या आणि केवड्याचे अत्तर वापरावे. * हळद-कुंकू वाहून नये –
हळद-कुंकू उत्पत्तीचे प्रतीक आहे म्हणून लयाची देवता असलेल्या शिवाला हळद-कुंकू वाहू नये.
* पिंडीला अर्ध प्रदक्षणा का घालावी ?
शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालताना अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी असते त्यापर्यंत जावे आणि ती न ओलांडता परत फिरावे आणि पुन्हा पन्हाळी पर्यंत उलटे येऊन प्रदक्षणा पूर्ण करावी. साळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्त्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो म्हणून शिवपिंडीला अर्ध प्रदक्षिणा घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.
– सौ सुवर्णा साळुंखे, जळगाव