नंदुरबार – युवासेनेचे माजी जिल्हाअध्यक्ष राहूल संतोष चौधरी यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला .
युवा सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल चौधरी गेल्या अनेक दिवसांपासून भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या संपर्कात होते. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी काल शनिवार दि.27 रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते देखील पक्षात दाखल झाले. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आ.राजेश पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, संघटन सरचिटणीस निलेश माळी आदी याप्रसंगी उपस्थित होते.