वाचकांचं मत:
पितृपक्ष काळात सश्रद्ध हिंदू श्राद्धविधी करतात. पूर्वापार चालत असलेल्या परंपरा पाळण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. असे असले, तरी तथाकथित पुरोगामी मंडळींकडून हिंदूंच्या अन्य सणांप्रमाणे श्राद्धपक्षाच्या संदर्भात हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करून हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो.
अमेरिकेतील हॉलीवूड अभिनेते सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांनी भारतात येऊन त्यांच्या मुलाचे श्राद्ध केले होते. प्रत्येक वर्षी असंख्य विदेशी श्राद्ध करण्यासाठी भारतात येतात. नायजेरिया, रशिया, युनायटेड किंगडम आदी देशांतून विदेशी लोक श्राद्धविधी करण्यासाठी गया आदी ठिकाणी आले होते. ‘जुनी वहिवाट बंद करून नव्या प्रथा चालू करण्या’चे आवाहन पाश्चात्त्य खूळ अंगी असणार्यांनी प्रयत्न चालू केले आहेत. अनेक पाश्चात्त्य व्यक्ती भारतातील तीर्थक्षेत्री येऊन श्राद्धादी विधी करतात, तर अनेक विदेशी हे श्राद्धावर संशोधनही करत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. कथित पुरोगाम्यांच्या धर्मविरोधी कारस्थानांना बळी न पडता हिंदूंनी ‘श्राद्ध’ या हिंदु धर्मातील विधीकडे सकारात्मक आणि अध्यात्मशास्त्रीय दृष्टीने पहाणे आवश्यक आहे.
– श्री. निलेश पाटील, जळगाव