नगर – महाराष्ट्रातील नाथसंप्रदायाचे सर्वपरिचित संशोधक श्री.मिलिंद सदाशिव चवंडके यांच्या सिध्दहस्त लेखनीमधून साकारलेल्या ‘||श्री कानिफनाथ महात्म्य||’ या ग्रंथास विविध प्रांतांमधील भाविकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अवघ्या २७ दिवसांत १००० ग्रंथ भाविकांपर्यंत पोहोचले. साध्या, सोप्या, रसाळ, शुध्द मराठी भाषेत ओवीबध्द लिहिलेले या ग्रंथामधील अध्याय भाविकांना अधिक भावले. त्यामुळे भाविकांच्या अपेक्षा वाढल्या असून विविध भाषेत हा ग्रंथ अनुवादीत करावा, अशी सुचना भाविकांकडून केली जावू लागली आहे.
भाविकांची अपेक्षापूर्ती करण्यासाठी ग्रंथकार श्री.मिलिंद चवंडके यांनी || श्रीकानिफनाथमाहात्म्य || या मराठी ग्रंथाचा अनुवाद हिंदी, इंग्रजी, कन्नड व तेलगु भाषेत करण्याचा संकल्प केला आहे. या अनुवादाच्या कार्याने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, नेपाळ, गुजराथ, राजस्थान, केरळ, तामिळनाडू, तिबेट अशा भारतातील सर्वदूर प्रांतांमधील भाविकांना तसेच अमेरिका, युरोप या परदेशात गेलेल्या भाविकांना ग्रंथाचा लाभ मिळेल, असा विश्वास श्री.मिलिंद चवंडके यांनी व्यक्त केला.
नवनाथांमधील प.पू.श्रीकानिफनाथांच्या ग्रंथासारख्याच आठही नाथांच्या स्वतंत्र ग्रंथांची निर्मिती करून तेही ग्रंथ अशाच पध्दतीने पाच भाषांमध्ये भाविकांच्या हाती देण्याचा संकल्प श्री.मिलिंद चवंडके यांनी केला आहे.
ग्रंथनिर्मितीची वास्तू पावन क्षेत्र होणार
आजवरच्या नाथसंप्रदायाच्या इतिहासात प्रथमच नवनाथांच्या ग्रंथांचे स्वतंत्र लेखन घडणार आहे. पुणे शहराच्या परिसरात या ग्रंथ लेखनाचे अव्दितीय दैवी कार्य होईल, असे भाकित नाथयोग्यांकडून वर्तविले जात आहे. जेथे ग्रंथ लेखनकार्य घडेल ती जागा अलौकीक ऊर्जास्तोत्राचे उगमस्थान म्हणून ओळखली जाईल. भारतासह परदेशातील भाविकांचे श्रध्दास्थान ठरेल. या ऐतिहासिक दैवी नाथकार्याचे महत्व लक्षात घेऊन कोण दानशूर भाविक रमणिय परिसरातील जागा दान करण्याचे पवित्र पुण्यकार्य करेल, याबद्दल नाथभक्तांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
गोव्यातील रामनाथी येथील सनातन आश्रमाच्या चित् शक्ती सौ.अंजलीताई गाडगीळ यांच्याकडे ग्रंथकार श्री.मिलिंद चवंडके यांनी || श्रीकानिफनाथमाहात्म्य || या ग्रंथाचे पाठवलेले सर्वच अध्याय महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर या अत्याधुनिक उपकरणाव्दारे पाहिले. उपकरणाने दिलेला वैज्ञानिक चाचणीचा अहवाल ग्रंथामध्ये उतरलेली नाथांची दैवी शक्ती दाखवून देणारा ठरला आहे. करवीरपीठाच्या शंकराचार्यांनीही या ऐतिहासिक दैवी ग्रंथाचे आजच्या काळातील महत्व अधोरेखीत केले आहे. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू श्रीक्षेत्र देवगड येथील ह.भ.प.श्री. भास्करगिरी महाराज यांनीही या ग्रंथाचे वेगळेपण दाखवून दिले आहे.
आजच्या प्रगत संगणक युगात ओवीबध्द ग्रंथ लेखन करणारे संपूर्ण विश्वात अत्यंत दुर्मिळ आहेत. महाराष्ट्रातील श्री.मिलिंद चवंडके यांच्या हातून नाथसंप्रदायावर विशेष कार्य घडेल, हे सनातनचे संत पू.श्री.प्रा. अशोकजी नेवासकर काका यांनी चित् शक्ती सौ.गाडगीळ काकूंना सांगितले होते. ते तंतोतंत खरे ठरले. श्रीक्षेत्र मढी येथील प.पू.श्रीकानिफनाथ संजीवन समाधी मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा विश्वस्त म्हणून कार्यभार हाती घेताच श्री. मिलिंद सदाशिव चवंडके यांनी गर्भगिरीतील पहिले नाथ संमेलन घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. संमेलनाचे नियोजन करताना त्यांनी महाराष्ट्रातील नाथपीठांवरील पिठाधिपती आणि मठाधिपतींच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत आशीर्वाद घेतले. या भेटीमध्येही सर्वांनी त्यांना- ‘तुमच्या हातून अलौकीक नाथकार्य घडेल, ‘असा आशीर्वाद दिला. नाथसंमेलनाच्या व्यासपीठावरूनही जाहिरपणे याच भविष्यवाणीचा पुनरूच्चार झाला होता.
श्री.चवंडके यांना ओवीबध्द ग्रंथ लेखनाची प्रेरणा स्वतः नाथांनीच देणे व पोथी लिहून पूर्ण होणे, हा नाथभक्तांसाठी मोठा कृपाप्रसादच ठरला असल्याचे घरोघरी पोहोचलेल्या ||श्रीकानिफनाथमाहात्म्य || या ग्रंथाने स्पष्ट केले आहे. भाविकांना या ग्रंथ पारायणामधून आश्चर्यकारक अनुभूती येत असून नोकरी, विवाह व प्रापंचिक अनेकविध अडचणी सुटल्याचे अन् अध्यात्मिक मार्ग सुकर झाल्याचे अनुभवास येत आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गोवा, गुजराथ, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दुबई, अमेरिका येथील मराठी भाषिक भाविक ग्रंथ वाचनातून येत असलेल्या प्रभावी अनुभूतींचा आनंद घेत आहेत. कुटूंबातील प्रापंचिक समस्या, वैवाहिक समस्या, नोकरीची समस्या, बाहेरची बाधा, ग्रहपिडा, ताण-तणाव अशा अडचणी या ग्रंथाच्या नित्य वाचनामधून सुटत चालल्या असल्याच्या प्रतिक्रिया श्री.चवंडके यांच्याकडे मोठ्या संख्येने येऊ लागल्या आहेत.
नवनाथांच्या स्वतंत्र ग्रंथाचे लेखन करण्यासाठी पुरातन जनमान्य कथांचे संकलन करण्याचा शुभारंभ श्री.मिलिंद चवंडके यांनी केला आहे. अखिल विश्वामध्ये हे नाथ कार्य प्रथमच होणार आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड आणि तेलगू या पाच भाषांमध्ये नवनाथांचे स्वतंत्र पारायण ग्रंथ प्रथमच साकारणार असून दररोज वाचण्याकरिताही ते उपयुक्त ठरणार आहेत.
ग्रंथकार श्री.मिलिंद चवंडके यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, “या कार्यासाठी मोठा खर्च लागणार हे उघडच आहे. एका भाषेत नाथांचा ओवीबध्द सचित्र ग्रंथ निर्माण करण्यास अडीच ते तीन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. एका नाथाच्या पाच भाषेतील ग्रंथांसाठी सुमारे पंधरा लाखांचा खर्च होईल. नवनाथांचे नऊ ग्रंथ प्रत्येकी पाच भाषांमध्ये निर्माण करण्याकरिता एक कोटी पस्तीस लाखांचा खर्च होईल. हे ऐतिहासिक नाथकार्य पूर्णत्वास जाण्याकरिता सढळ हाताने अर्थसहाय्य करणे गरजेचे आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व दीपावली या उत्सवांचा आनंद साजरा करताना नवनाथांच्या ग्रंथनिर्मितीच्या ऐतिहासिक दैवी कार्यास मदत करण्याची सुवर्णसंधी पर्वणीसारखी आली आहे. चिरकाल टिकणार्या ग्रंथनिर्मितीस भरभरून दिलेले दान पुण्यकर्मच ठरणार आहे. उत्सवांची ही पर्वणी साधून सढळ हाताने अर्थसहाय्य करणे पुण्यप्राप्तीचा आनंद मिळवून देणारे ठरेल. नाथकार्याचा प्रचार व प्रसार करण्याचे व्रत स्वतः नवनाथांनी हाती घेतले होते. हेच व्रत या ग्रंथ निर्मितीमधून पुढे चालणार असून आपलाही या ऐतिहासिक कार्यात हातभार लागला हा आनंद चिरकाल मिळेल.”
तन-मन-धन जे शक्य ते सहकार्य स्वयंस्फूर्तीने करावे. जनमानसात प्रचलित असलेल्या आणि नाथांचे माहात्म्य वाढवणार्या नवनाथांच्या कथा श्री.मिलिंद चवंडके यांना पाठवाव्यात. विभिन्न प्रांतामध्ये नवनाथांच्या मन भारावून टाकणार्या कथा आहेत. श्रद्धाळू भाविकांची भक्ती वाढवणार्या कथा जनमानसात आजही प्रचलित आहेत. विविध पुरातन ग्रंथांमध्येही नवनाथांच्या कथा आहेत. नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाथस्थल, तपोभूमी, साधनाभूमी विविध ठिकाणी आहे. या सर्वांची विस्तृत माहिती पुरातन ग्रंथाआधारे संकलीत करून श्री. चवंडके यांच्याकडे पाठवून या नाथकार्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळवावे, असे आवाहन नाथभक्तांकडून करण्यात आले आहे.
———————-
🕉 या पुण्यकारक कार्यास आर्थिक योगदान पाठवण्यासाठी बॅक खात्याची माहिती अशी –
MILIND SADASHIV CHAVANDKE
IDBI BANK
A/C No. 0493104000162821
IFSC : IBKL0000493
MICR : 414259001
———————-
🕉 पोथी निर्मितीसाठी माहिती पाठवण्याचा पत्ता असा –
मिलिंद सदाशिव चवंडके
स्वागत बिल्डिंग, महादेव मंदिरासमोर, अमृतकलश अपार्टमेंट जवळ, बोरूडे मळा, मु.पो.जि. अहमदनगर. (महाराष्ट्र) पिन कोड ४१४ ००१. चल-दूरभाष – ९४२२४९५२८९.
———————