नंदुरबार – येथील श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीतर्फे श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांना सर्व समाज बांधवांच्यावतीने सामुहिक अभिवादन करण्यात आले.
हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 425 व्या पुण्यतिथी निमित्त श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीतर्फे राजपूत समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकभाऊ राजपूत व न्युज पेपर असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यभान राजपूत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘राणा की जय जय, शिवा जय जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रत्नदिप पाटील, वामन राजपूत, हिम्मतसिंग राजपूत, हेमंतसिंग राजपूत, चेतनसिंग राजपूत, सुरेश राजपूत, डॉ नरेंद्र पाटील, राजेंद्र राजपूत बाबासाहेब राजपूत, चंद्कांत राजपूत, सुदाम राजपूत अरुण पाटील, शेखर राजपूत, सुमानसिंग राजपूत, पवन राजपूत, अजय राजपूत, राजेश राजपूत, कांतीलाल राजपूत, शरद राजपूत, भगतसिंग राजपूत, हंसराज राजपूत, विजय राजपूत दत्तात्रय राजपूत, उदेसिंग राजपूत, विशाल राजपूत, दीपक राणा, कल्याणसिंग राजपूत, सचिन राजपूत, राजा राजपूत , नाना, विश्वजित राजपूत, भोला राजपूत, मयुरेश राजपूत, कुणाल राजपूत, रोहन राजपूत, महेश राजपूत आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.