वाचकांचे मत:
मा.
संपादक,
दत्तजयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया श्री दत्तात्रेयांची प्रमुख तीर्थक्षेत्रे
कलियुगामध्ये सर्वत्रच अतृप्त अशा पूर्वजांच्या इच्छां मुळे, जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेले दिसतात. अडचणी पासून रक्षण होण्यासाठी पितरांना सद्गती देणारे श्री दत्तात्रेय हे सर्वांचा आधार आहेत. आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय म्हणून दत्तात्रेयाची उपासना विविध मार्गाने केली जाते .यामध्ये श्री दत्तात्रेयांचा नामजप करणे त्याचप्रमाणे दत्त क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील शक्ती ग्रहण करणे श्री दत्तयाग करणे अशी अनेक उपासना मार्ग उपासनापद्धती आपल्यापैकी अनेक जण अवलंबतात. आपल्या सर्व चिंता श्री गुरुदेव दत्त यांच्या चरणी ठेवून आपण निश्चिंत होतो. कलियुगामध्ये दत्तात्रयाची उपासना सर्वश्रुतच आहे.यातीलच एक भाग म्हणजे दत्त क्षेत्रांना भेटी देणे दर्शन घेणे इत्यादी त्यामुळे दत्तजयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया श्री दत्तात्रेयांची प्रमुख तीर्थक्षेत्रे.
माहूर : महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामधील किनवट तालुक्यामध्ये असणारे माहूर हे तीर्थक्षेत्र.
गिरनार : दहा हजार पायऱ्या असणारे सौराष्ट्र येथील अर्थात जुनागडजवळ असणारे गिरनार.
कारंजा : श्री नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान असलेले कारंजा.
औदुंबर : श्री नृसिंह सरस्वती यांनी एक चातुर्मास जेथे निवास केला. महाराष्ट्रामध्ये कृष्णाकाठी असलेले हे गाव.
नरसोबाची वाडी : श्री नरसिंह सरस्वती अर्थात टेंबे स्वामी यांनी जेथे बारा वर्षे निवास केला, असे त्यांचे प्रेरणास्थान म्हटले जाते.
गाणगापूर : श्री नरसिंह सरस्वती यांनी 23 वर्ष ती वास्तव्य केले असे कर्नाटकातील पुणे रायचूर महामार्गावर असलेले गाणगापूर तीर्थ क्षेत्र.
याच प्रमाणे कुरवपूर, पिठापूर, वाराणसी,श्री शैल्य, पंचाळेश्वर ही देखील श्रीदत्तात्रेयांची तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातात. चला तर ,या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण या तीर्थक्षेत्रांचे पावन दर्शन घेऊया स्मरण करूया . दत्तात्रेयांची शक्ती अनुभवूया!
!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
– सौ. रोहिणी जोशी, संभाजीनगर