संप भोवला ! धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील 271 एसटी कर्मचारी निलंबित

नंदुरबार – गेल्या  21 दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपात आता निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात येत असून विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 271 कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे.
 एकीकडे परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीवर संपकरी कर्मचारी ठाम आहेत तर दुसरीकडे सरकार तोडगा काढत नसलयाने व  एसटी धावत नसल्यामुळे सामान्य घरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी सर्वच वैतागलेे आहेत. यात जिल्ह्यातील सर्व आगारातील कर्मचाऱ्यांचा समावेश असून नंदुरबार, शहादा, तळोदा  आणि नवापूर प्रत्येकी वीस कर्मचाऱ्यांप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील 80 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असल्यााचे सांगण्यात आले कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार नोटिसा बजावण्यात येत आहेत. यावर लवकरच तोडगा निघावा अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!