नंदुरबार – अर्हत् प्रतिष्ठान नंदुरबार वतीने शुक्रवार दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता कोरीट नाका परिसर येथे संविधान गौरव दिन निमित्ताने संविधान सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या तथा खासदार डॉ. हिना गावित तसेच माजी मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संविधान प्रास्ताविकेचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात येईल. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व विषद करण्यात येणार आहे. तरी उपस्थित रहावे, असे आवाहन अर्हत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पानपटील यांनी केले आहे.