सदैव असेच पाठीशी राहा; डॉ.हिना गावित, डॉ.सुप्रिया गावित यांची कार्यकर्ते बंधूंना भावनिक साद

ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर पितांबर सरोदे यांना राखी बांधताना खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित समवेत सभापती हेमलता शितोळे, सविता जयस्वाल व अन्य
नंदुरबार -तळागाळातल्या जनतेपर्यंत विकास पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने राजकारण करताना कार्यकर्ते विरोधी  पक्षातले असो की स्व पक्षातले असो, ते सर्व आपले बंधूच आहेत, हा दृष्टिकोन ठेवूनच राजकारण करीत आले. आम्हा दोघी भगिनींच्या या संपूर्ण वाटचालीत या सर्व बंधूंनी दिलेली साथ मोलाची राहिली. त्या भावांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला,  असे स्पष्ट करतानाच “यापुढेही तुमचे ते प्रेम आणि आशीर्वाद रक्षाबंधनाची भेट म्हणून मिळत राहू द्या आणि सदैव असेच पाठीशी राहा”; असे भावनिक आवाहन खासदार डॉक्टर हिना विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी भव्य सामूहिक रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात केले.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील राजकीय, व्यावसायिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकाच वेळी राख्या बांधण्यासाठी खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सामूहिक रक्षाबंधनाचा भव्य सोहळा आयोजित केला होता.
छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्याला आवर्जून उपस्थित रहात ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर पितांबर सरोदे यांनी खासदार डॉक्टर हिना गावित व डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते राखी बांधून घेतली. दोन्ही भगिनींनी नम्रपणे त्यांच्या पायाला नमस्कार केला आणि त्यांनी आशीर्वाद दिले, ते दृष्य उपस्थित कार्यकर्त्यांना क्षणभर भावूक बनवून गेले. 
भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी, भाजपाचे माजी प्रतोद आनंद माळी, भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र माळी, नगरसेवक संतोष वसईकर, लक्ष्मण माळी,  माणिक माळी, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशी, ज्येष्ठ कार्यकर्ते धनराज पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर तसेच सर्व तालुक्यातील विविध गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,  जिल्हा परिषद सदस्य,  जिल्हा परिषदेचे सभापती,  नगरसेवक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय अथवा पक्षीय भेद न करता एकाच वेळी शेकडो जणांना राखी बांधण्याचा असा सामूहिक भव्य सोहळा नंदुरबारच्या राजकीय इतिहासात प्रथमच संपन्न झाला.  भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी उपस्थित प्रत्येकाला राखी बांधून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समावेत व्यासपीठावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्य एडवोकेट उमा चौधरी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सविता जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या सभापती सौ हेमलता शितोळे, जिल्हा परिषद सदस्य जयश्री व  अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!