समतोल आहार आणि विरुद्ध अन्न

समतोल आहार म्हणजे जो तुमच्या शरीरातील प्रथिने ,पोषकद्रव्ये ,चरबी या गोष्टी समतोल ठेवतो असा आहार.
 तो खाल्ल्याने आपल्या शरीरातील चरबी वाढत नाही .समतोल आहार प्रथिनयुक्त असतो त्यात तंतुमय पदार्थांचा व फळांचा समावेश असतो .
धावपळीच्या जीवनात आपण काय अन्न खातो  या कड़े लक्ष देत नाही. माणसाच्या शारीरिक मानसिक वाढीसाठी योग्य आहाराची गरज असते तो कमी किंवा जास्त ही झाला तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. म्हणून आहार समतोल राखणे गरजेचे आहे .थोडेसे वजन वाढले तरी आहार कमी करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये अधिक आहे परंतु त्यामुळे अशक्तपणा येतो. लठ्ठपणा म्हणजे असंतुलित आहाराचे लक्षण होय.
संतुलित आहारात कोणत्या गोष्टीचा समावेश होतो हे आपण आता पाहू या.
शरीराचे कार्य सुरळीत चालू राहावे म्हणून दोन वेळेस जेवण आवश्यक आहे त्या जोडीला मध्ये नाश्ता पाहीजे.
दिवसाच्या सुरुवातीला केलेल्या नाष्टा बाकी दोन्ही जेवाणा पेक्षा जास्त असावा ,रात्रीचे जेवण हलके पचण्यास सोपे असावे.
सकाळची न्याहारी यामध्ये एक ग्लास दूध किंवा वाटीभर दही ,शिरा, पोहे ,पोळी भाजी आणि फळे यापैकी एक असावे.
दुपारच्या जेवणात डाळी ,चपाती किंवा भाकरी ,भात ,दही किंवा कोशिंबीर आणि भाजी हे असावे.संध्याकाळच्या न्याहारीत चणे ,दाणे ,पनीर किंवा एखादे फळ असावे .रात्रीच्या जेवणात भाकरी किंवा पोळी ,भाजी किंवा खिचडी असावी. जेवणात तळलेले पदार्थ तसेच गोड पदार्थ जास्त घेऊ नये .
म्हणजेच काय प्रथिने (protiens) ,कार्बोदके (carbohyadrates), स्निग्ध पदार्थ( fatty food) ,जीवनसत्व ( vitamines ) ,क्षार (minerals)या सर्वांचा आहारामध्ये समावेश आसावा. पचनक्रिया योग्य  संतुलित राहण्यासाठी आपण जे अन्न घेतो ते एकमेकांना पूरक पाहिजे म्हणजे विरुद्ध अन्न आपण खाऊ नये याचे परिणाम उलट होतात .
आता आपण विरुद्ध अन्न म्हणजे काय हे बघूया. दोन गोष्टी एकत्र खाल्ल्यावर त्याचा दुष्परिणाम  आपल्या शरीरावर होतो त्याला आपण विरुद्ध अन्न असे म्हणतो.
 दुधासह दही ,मीठ ,आंबट वस्तु ,खारट वस्तु,तेलकट  वस्तु,तिखट पदार्थ खाल्ले की त्याचे चुकिचे परिणाम शरीरावर होतात.
  दुधासह चिंच , मुळा ,डाँगर ,मुळ्यांची पाने ,दोडका ,फणस सातू ,तळलेले पदार्थ खाऊ नयेत .दूधात गूळ टाकून त्याला उकळू नये.
तुपासह थंड दुध ,थंड पाणी हानिकारक असते .वनस्पती तुपात त्यापासून बनवलेल्या पदार्थ सह साखर असलेले पदार्थ,लोणकढ़ें  तूप खाऊ नये.
दहयासह केळ,डांगर ,खरबूज ,मुळा ,खीर ,दूध ,पनीर व गरम जेवण खाऊ नये .तेल युक्त पदार्थांसह मध साखर असलेले पदार्थ खाऊ नये .मोहरीच्या तेलाचे पदार्थ सोबत दही ,गाजर खाऊ नये .मांसाहारी पदार्थ सोबत मध,पनीर खाऊ नये तसेच मांसाहारी पदार्थ सोबत मूग ,उडीद ,गुळ, दूध घेऊ नये. माशा सोबत ग़ुळ, दुग्धजन्य पदार्थ, उसाचा रस ,मध खाऊ नये .मधाबरोबर मुळा ,खरबूज ,तूप ,द्राक्षे ,गरम पाणी ,पावसाचे पाणी हानिकारक असते .नारळाचे पाणी व कापूर एकत्र सेवन करू नये .चहाबरोबर थंड फळे ,काकडी ,थंड पाणी घेऊ नये ,थंड पाण्यासोबतशेंगदाणे ,खरबूज ,पेरु ,जांभळे काकडी ,गरम दुध ,गरम भोजन घेऊ नये . खीरी सोबत खिचडी ,आंबट पदार्थ ,फणस व सातु खाऊ नये .उडदाच्या पदार्थ सोबत दही ,दूध कैरी ,चिंच ,गूळ घेऊ नये .फणस खाल्यावर विड्याचे पान खाणे सुद्धा हानिकारक असते.
                            – डॉ. संगीता जाधव,
   होमिओपथी तज्ञ, संभाजीनगर (औरंगाबाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!