नंदुरबार – सहकार भारती संस्थेचे अखिल भारतीय राष्ट्रीय संघटनमंत्री आणि मूळचे परभणी येथील रहिवासी संजय पाचपोर यांचे नंदुरबार रेल्वे स्थानकावर सहकार भारतीतर्फे स्वागत करण्यात आले. सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कालिदास पाठक, जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे यांनी संजय पाचपोर यांचे पुष्पगुच्छ देऊन नंदुरबार वासियांच्या वतीने स्वागत केले. शुक्रवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास भागलपूर- सुरत एक्सप्रेस रेल्वेने संजय पाचपोर प्रवास करीत होते. सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर यांनी याप्रसंगी नंदुरबार येथील जुन्या आठवणींना उजाळा दिला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शुभम स्वामी, अभिजीत खेडकर, मारुती कल्याणकर, राजेंद्र पावरा, प्रीतम निकम, गणेश चौधरी आदी उपस्थित होते. संघटन मंत्री पाचपोर हे नंतर नंदुरबार मार्गे सुरतहुन जयपूर येथे रवाना झाले.