नंदुरबार – सहकारातून समृद्धीकडे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असलेल्या सहकार भारती संस्थेच्या नंदुरबार जिल्हा संघटनमंत्री या पदावर महादू हिरणवाळे यांची निवड करण्यात आली आहे. सहकार भारतीच्या जिल्हास्तरीय बैठकीत नाशिक विभागीय संघटक दिलीप लोहार तसेच धुळे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह राजपूत, नंदुरबार जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक यांच्या उपस्थितीत महादू विठ्ठल हिरणवाळे यांची नंदुरबार जिल्हा संघटनमंत्री म्हणून नियुक्ती घोषित करण्यात आली.