नंदुरबार – साखरपुडा सोहळ्यातच वृक्षलागवड करून पर्यावरण समतोल राखण्याचा संदेश नंदुरबार तालुक्यातील काकरदे येथील खलाने परिवाराने दिला आहे. काकरदे येथील एकनाथ लक्ष्मण खलाने यांची कन्या आश्विनी व चिमठाणे येथील राजेंद्र भिका माळी यांचे पुत्र उमेश यांचा रविवारी साखरपुडा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे औचित्य साधून खलाने परिवाराने जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात भावी वधूवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी सरपंच प्रकाश माळी, देविदास माळी, भटू माळी, दत्तात्रय माळी, रवींद्र माळी ,गुलाब माळी , बन्सीलाल महाजन, बबलू माळी, नामदेव माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. साखरपुडा सोहळ्यात खलाने व माळी परिवाराने वृक्षारोपण करून पर्यावरणाचा अनोखा संदेश देत ग्रामस्थांसमोर आदर्श घालून दिला आहे.