साडे तीन लाखांची वीज चोरी; भरारी पथकाने दिला कारवाईचा ‘शॉक’

नंदुरबार: अक्कलकुवा शहरातील वीज बिलाची थकबाकी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना आज अचानक वीज महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने कारवाईचा शॉक दिला. यामुळे अक्कलकुवा-वाण्याविहीर येथील 5 व्यापाऱ्यांवर ३ लाख ४६ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले.

प्राप्त माहितीनुसार, अक्कलकुवा शहरातील विविध व्यापार्‍यांकडून दि. १५ जुलै २०२१ पासून वीज वापराची थकबाकी होती. याबाबत वेळोवेळी तळजोडी करून थकीत वीज बिल रक्कम भरणा करण्यात आला नाही. परिणामी संबंधीत व्यापार्‍यांनी स्वतचा आर्थिक फायद्यासाठी वीज चोरी करून महावितरण कंपनीची फसवणूक करून वीज वितरण कंपनीचे भरारी पथक प्रमुख बकुळ रामदास मानवटकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, अक्कलकुवा शहरातील मनोज राणुलाल डागा याने २७ हजार ५९० रूपये, मनोज हस्तीमल जैन याने १४ हजार ५०, महाविर मदनचंद जैन याने ८३ हजार ३३०, रमेश परमसूख तंवर ६९ हजार ६०० रूपये, दिलीप बैजूनाथ परदेशी १५ हजार ५३० या प्र्रमाणे एकुण ३ लाख ४६ हजार १०० रूपयांची वीज चोरी केली. या प्र्रकरणी भादंवि कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!