वाचकांचे पत्र:
सातत्याने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवीच !
पुन्हा एका विशिष्ट जमावाने कायदा हातात घेऊन राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ, सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. ‘आम्ही कायद्याचे उल्लंघन केले तरी आमचं काही होऊ शकत नाही’, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले आहे. घटना कुठली, निषेध करता कुठे? त्याची पध्दत कशी असावी ? याचे काहीच भान या विशिष्ट जमावाने कधी ठेवले नाही. बेदरकारपणे कायदा धाब्यावर बसवून विना परवानगी ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. तरीही त्यावर केवळ कागदोपत्री जुजबी कारवाई करून सोडून दिले जाते, हीच कायद्याची शोकांतिका आहे. ‘जिथे कायद्याचा बडगा उगारला पाहिजे, तिथे शेपूट घालायची आणि जिथे सौजन्याने काम होणार असते तिथे बडगा उगारायचा’ ही पद्धत चुकीची ठरते. राजकीय हस्तक्षेप केल्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो हे वेगळे सांगणे नको. दहशतवाद कसा संपवावा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आहे आणि आताही ते अनेक बाहुबली धर्मांधांवर केलेल्या कठोर कारवाईच्या माध्यमातून योगी सरकारने दाखवून दिले आहे. पण, अन्य कोणी यातून बोध घेणार नाही, कारण प्रश्न ‘व्होट बँक’चा आहे हो ! यासाठीच जनहीतकारी पितृशाही म्हणजे हिंदुराष्ट्राची आवश्यकता लक्षात येते.
– रवींद्र हेम्बाडे, जळगाव