सुझलॉन तार चोरीत आढळले बागवान गल्लीतील भंगार विक्रेत्याचे कनेक्शन; एलसीबीने केले 6 जणांना जेरबंद

नंदुरबार – सुझलॉन पवन उर्जा प्रकल्पात टॉवरची वायर चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करीत ५ लाख ३६ हजार ६०० रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला व दोन गुन्हे उघडकीस आणले. या तपासात टॉवरवरील केबलचोरीशी नंदुरबार शहरातील बागवान गल्लीतील भंगार विक्रेत्याचे कनेक्शन उघड झाले आहे.

दिनांक दि. 22/02/2022 रोजी रात्री 08/00 वा ते दि. 27/02/2022 रोजी पहाटे 03/00 वा. शनिमांडळ टॉवर सी 33 के 340, टॉवर मधील 15,200 रु कि. 975 मी. केवल वायर चोरीस गेल्याची फिर्याद राजेश चिंतामन पाटील यांनी दिली होती. त्या वरून नंदुबार तालुका पोलीस ठाणे गुरनं 78/2022 भादंवि के 379 प्रमाणे नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्हा उघडकीस आणून मालमत्ता हस्तगत करणे व गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत आदेशीत केले. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. चाकळे ता.जि. नंदुरबार येथील सागर पाडवी व त्याचे इतर 5 ते 6 साथीदार यांनी सुझलॉन कंपनीच्या टॉवरवरील तांब्याची तार चोरली आहे व नंदुरबार शहरातील भंगार विक्रेत्याकडे विकण्यासाठी आलेले असून सध्या नंदुरबार शहरात धुळे चाफुलीवर फिरत आहेत, अशी माहिती दिनांक 1/3/2022 रोजी पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना खबऱ्याकडून मिळाली. एक पथक तात्काळ धुळे चौफुली येथे जावून संशयीतांचा शोध घेतला असता तेथे काही तरुण मोटरसायकलीवर बसलेले दिसले व त्यांचे मोटरसायकलीवर प्लास्टीकच्या गोण्या दिसून आल्या त्यांचा संशय आल्याने तपास पथकाने त्यांना जागीच ताब्यात घेऊन त्यांचेकडील प्लास्टीकच्या गोण्या तपासल्या असता त्यात 74.78 कि.ग्रॅ वजनाची 37,400/– किमतीची तांबे धातुची वायर मिळून आली. ज्ञानेश्वर वसंत मोरे वय 24 रा. भवानी चौक शनीमांडळ, न्हानभाऊ भगवान भिल वय 26 रा. भवानी चौक शनीमांडळ, किरण मंगलसिंग भिल वय 22 रा. तिलाली भिलाटी शनीमांडळ,  लखन बापु भिल वय 22 रा. शनिमांडळ, अर्जुन भिला पवार वय 24 रा. चाकळे, सागर शिवनाथ पाडवी वय 19 रा. चाकळे अशी त्यांनी नावे सांगितली. चौकशीत त्यांचे इतर 2 साथिदार विपुल कोळी रा. शनीमांडळ व प्रशांत कोळी रा. रजाळे यांची नावे समोर आली. त्यांनी शनिमांडळ टॉवर सी 33 के 340, टॉवर मध्ये चोरी केली असल्याचे कबुल केले. तसेच 10 ते 15 दिवसांपूर्वी गंगापुर शिवारातून टॉवर क्र. 34 मध्ये देखील चोरी केल्याचे कबुल करुन चोरी केलेली वायर अर्शद शहा भिकन शहा फकीर वय 30 रा. बागवान गल्ली नंदुरबार यास विकल्याचे सांगितल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार अर्शद शहा भिकन शहा फकीर याच्या भंगार दुकानाची झडती घेतली असता त्याच्या दुकानात 49.200/- किमतीची 98.400 किलोग्रॅम वजनाची तांबे धातुची वायर मिळून आली. त्यास त्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरची वायर ही 10 ते 12 दिवसांपूर्वी शनिमांडळ येथील लोकांकडून विकत घेतल्याचे कबुल केले. त्यामुळे वरील 5 आरोपी व चाेरीचा माल विकत घेणारा भंगार विक्रेता अशा एकूण 6 आरोपींना दिनांक 1/3/2022 रोजी सांयकाळी अटक करण्यात आली. या आरोपींकडून नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गुरन 78/2022 भादवि कलम 379 व 79/2022 भादवि कलम 379 असे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपी हे चोरी करण्यासाठी महागड्या व हायस्पीड मोटर सायकली वापरतात. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेल्या 1 केटीएम, 3 बजाज पल्सर अशा एकूण 4 मोटरसायकली 5 मोबाईल हॅन्डसेट, चोरी केलेली केवल वावर असा एकूण 5 लाख 36 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपींना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री.पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पोहवा प्रमोद सोनवणे, पोना राकेश मोरे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, आनंदा मराठे, शोएब शेख, चापोना/ रमेश साळुंखे यांचे पथकाने केली असून मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी संपूर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!