नंदुरबार- नंदुरबार नगर परिषदेतील वसुली विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी तथा एक धर्मप्रेमी साधक श्री भरत दत्तात्रय पंडित यांना आज दिनांक 7 जून 2023 रोजी दहा तीस वाजता देवाज्ञा झाली. त्यांचे वय 59 वर्षे होते.
लालबाग कॉलनीतील दत्तात्रय निवास प्लॉट क्रमांक 28 या त्यांच्या राहत्या घरापासून आज दिनांक सात जून रोजी सायंकासायंकाळी पाच वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते त्यासाठी सुरत येथील रुग्णालयात उपचार घेत होते हे उपचार चालू असतानाच आज त्यांचे निधन झाले. भरत पंडित यांनी नंदुरबार नगर परिषदे च्या वसुल विभागात 35 वर्षे प्रामाणिक सेवा दिली त्यासाठी पालिकेकडून त्यांचा सन्मान देखील करण्यात आला होता. त्याचप्रमाणे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक सेवा करणारे साधक म्हणून देखील शहरवासीयांना परिचित होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी भारती पंडित, सौरभ आणि जय हे दोन मुले आणि तीन भाऊ असा परिवार आहे. देव धर्म आणि राष्ट्र याला समर्पित राहून नित्यसेवा देणारा साधक आपल्यातून निघून गेल्याची भावना व्यक्त होत आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!