स्वच्छता पंधरवाड्याचा समारोप; नंदुरबार रेल्वे स्थानक बनले चकाचक

   नंदुरबार : पश्चिम रेल्वे विभागातर्फे ऊधना-जळगाव मार्गावरील नंदुरबार रेल्वेस्थानकावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत स्वच्छता अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता पंधरवडाचा आज महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून समारोप करण्यात आला.
     स्वच्छता पंधरवडा अभियानाचे अध्यक्ष सहायक मंडल विद्युत इंजीनियर अमित कुमार साहू, ए डी ई एन राकेश कुमार रंजन, ए ओ एम रामेश्वर प्रसाद,  एडीएसटी सतीश लहरी, स्टेशन अधीक्षक वाणिज्य प्रमोद बाजीराव ठाकुर, रेल सुरक्षा बल निरीक्षक विजय पांडे, स्वास्थ्य निरीक्षक प्रदीप कुमार , भारत स्काउट गाइड यूनिट लीडर नीरज निराला तसेच समस्त कर्मचारी गण, अखिल महाराष्ट्र राज्य सफाई कामगार संघटना अध्यक्ष कुंदन, सफाई सुपरवाइजर धर्मेंद्र कड़ोसे, थनवार हे उपस्थित होते.
     या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर नंदुरबार रेल्वे स्थानकाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच स्वच्छता राखण्याची शपथ घेण्यात आली. नागरिकांनी, कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानक व परिसर तसेच घर आणि परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. त्यासाठी स्वत: तसेच इतरांना प्रेरीत करुन स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे. स्वच्छते विषयी जागृतता निर्माण करावी, तसेच या स्वच्छता अभियानात युवा तसेच नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन  याप्रसंगी करण्यात आले. दरम्यान, आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ परिसराचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!