वाचकांचं मत :
हिजाब प्रकरणातून ईतर तरुणी काही बोध घेणार का ?
आपल्याकडे मुलींना फक्त स्वातंत्र्य हवे, तोकड्या कपड्यात वावरणे, राहणं, खाणं पिणे, आणि मनोरंजन. मग आम्ही पुढारलेले. असंख्य हिंदु तरुणींना स्वधर्माविषयी आपुलकी नाही की धर्मज्ञान नाही. धर्माभिमान तर लांबची गोष्ट आहे. शाळेत, टिकल्या, बांगड्या घालून जायला सुद्धा लाज वाटते, शाळेत जातांना साडी घालणे, पंजाबी ड्रेस घालणे कमीपणाचे वाटू लागले आहे. याउलट मुस्लिम मुलींना बुरखा घालण्याची लाज वाटत नाही. बुरखा, हिजाब घालायला विरोध झाला तर त्या आंदोलन करतात. किती हा विरोधाभास, याला कारणीभूत आहे आपले संस्कार, संस्कृती ! ईतर मुली, तरुणी यातून बोध घेतील का ? हा प्रश्न पडतो. कारण ईतर धर्मीय महिला तरुणी मुली खुशाल दंड खांदे पाठ वगैरे सगळे उघडे दिसेल असे कपडे अन पोषाख वापरण्याला स्वातंत्र्य समजतात. खरे तर धर्मप्रेम आपल्यात न्युन झाल्याने हिंदु समाज भरकटला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली हिंदु मुली वाया जात आहे, कमीत कमी कपड्यात वावरणाऱ्या मुली बलात्काराला बळी पडत आहेत. मुस्लिम तरुणीला सांगावे लागत नाही संस्कृती जपा म्हणून. पण हिंदु मुलींना पश्चिमी संस्कृती जवळची वाटते, ही शोकांतिका आहे. माता जिजाऊ , राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई, या फक्त पुस्तकातच राहणार आहेत की, आपल्या आचरणातपण येणार आहेत, याचा विचार आजच्या तरुणींनी करण्याची आवश्यकता आहे. तरच खऱ्या अर्थाने आपण स्वराज्य अभिप्रेत रणरागिणी होऊ शकतो.
– रवींद्र हेम्बाडे, जळगाव