हरितालिका आणि गणेशचतुर्थी या व्रतांमागील शास्त्र समजून घेण्याची उत्सूकता अनेक जणांना असते. एनडीबी न्यूज वर्ल्डच्या त्या जिज्ञासु वाचकांसाठीच येथे ही माहिती देत आहोत. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धीविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपति ठेवून त्याचा उत्सव करू लागला. खरे शास्त्र यात दडपले गेले. आता तर सिनेमॅटिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीमुळे आणखीनच लयास गेले आहे. शास्त्र काय सांगते आणि उत्सव नेमका काय आहे; हे आपण जाणून घेतले पाहिजे.
सनातनच्या वतीने श्री गणपति, श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह), श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार आणि सात्त्विक असावी!, श्री गणेश अथर्वशीर्ष आणि संकष्टनाशनस्तोत्र (अर्थासह) हे ग्रंथही प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. श्रावण मास संपत आला की, सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. अध्यात्म शास्त्राच्या आधारे असे सांगितले जाते की, श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीया या दिवशी येणाऱ्या हरितालिका या व्रताच्या दिवशी स्त्रिया आणि कुमारिका व्रतस्थ राहतात. पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. या दिवशी प्रातःकाळी मंगलस्नान करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती आणून त्या शिवलिंगासह पूजल्या जातात. या पूजेमध्ये १६ शक्तीस्वरूप नाममंत्रांचे पठण करत १६ पत्री शिवपिंडीवर वाहतात. या पूजनातून शिव आणि त्याची शक्ती पार्वती यांच्या एकत्रीकरणातून पिंडीत आदिशक्तीची निर्मिती होते. आदिशक्ती या निर्गुण तत्त्वातून महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तीनही तत्त्वांची निर्मिती होऊन या शक्ती हरितालिका पूजनातून स्त्रीला प्राप्त होतात, असेही अध्यात्मशास्त्राच्या आधारे सांगितले जाते. या व्रतामध्ये रात्री जागरण करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून शिवलिंग आणि मूर्ती विसर्जित करतात.
शास्त्र असेही सांगते की, गणेशोत्सवात १ सहस्र पटींनी कार्यरत असलेल्या गणेशतत्त्वाचा लाभ घेण्यासाठी ‘ॐ गं गणपतये नमः’ हा नामजप करावा. गणेश चतुर्थीला, तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते. त्यामुळे या काळात गणपतीची उपासना करतात. गणेशोत्सवाच्या काळात आपण नेहमीची पूजा-अर्चा करतोच. त्या जोडीला या काळात ‘ॐ गं गणपतये नमः’ हा नामजप अधिकाधिक करावा. नामजप ही कलियुगातील साधना सांगितली आहे. नामजपाला स्थळ-वेळ यांचे बंधन नसल्याने ती सहजसोपी साधना आहे. शक्य झाले, तर गणेशोत्सवाच्या काळात कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून ‘ॐ गं गणपतये नमः’ हा नामजप करावा. सनातनच्या वतीने श्री गणपति, श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह), श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार आणि सात्त्विक असावी!, श्री गणेश अथर्वशीर्ष आणि संकष्टनाशनस्तोत्र (अर्थासह) हे ग्रंथही प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
असे आहे श्री सिद्धिविनायक व्रत
सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या माहितीत असेही म्हटले आहे की, श्री सिद्धिविनायक व्रत : वास्तविक गणेशोत्सव म्हणजे मूळ श्री सिद्धीविनायक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धीविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा करावी आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपति ठेवून त्याचा उत्सव करू लागला. बरेच जण (ज्येष्ठा ) गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन करतात. रूढीप्रमाणे पहिल्या, दुसऱ्या तिसऱ्या, सहाव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी श्री गणेशविसर्जन करावे. एखाद्याच्या कुलाचारात गणपति पाच दिवस असेल आणि तो त्याला दीड किंवा सात दिवसांचा करावयाचा असला, तर तो तसे करू शकतो.
श्री सिद्धिविनायक व्रत कोणी करावे ?
श्री सिद्धीविनायक व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सगळे भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) आणि स्वयंपाकघर (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एकच मूर्तीची पूजा करावी; पण द्रव्यकोष आणि स्वयंपाकघर कोणत्याही कारणास्तव विभक्त असेल, तर आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती स्थापित करावी. ज्या कुटुंबात एकच गणपति बसवण्याची परंपरा असेल आणि ती मोडायची नसेल, तर कुटुंबात ज्या भावामध्ये देवाविषयी अधिक भाव आहे, त्याच्या घरी गणपति बसवावा, असे या माहितीत म्हटले आहे.