नंदुरबार – आगामी काळात जिल्हयात १० हजार ५ कोटी रुपयांचे २७७.८९ किमीचे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रस्तावित आहेत. या व्यतिरिक्त नंदुरबार लोकसभा मतदार संघात नंदुरबार येथे क्रिटीकेअर हॉस्पीटलला मंजूरी, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सार्वजनिक आरोग्य शाळा उभारणे, जिल्ह्यात एक सैनिकी शाळा मंजूर करणे, जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कसाठी प्रयत्न, मेडिकल इक्वीपमेंट डिवाईस पार्क सुरु करणे, नंदुरबार येथे केंद्रिय विद्यालय सुरु करणे, नंदुरबार येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करणे, नंदुरबार येथे प्लास्टिक इंजिनीयरींग कॉलेज सुरु करणे आदी कामे प्रस्तावित आहेत, लवकरच त्यांना मंजूरी मिळणार आहे; अशी माहिती नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली.
सन 2014 ते 2022 या नऊ वर्षाच्या कालावधीत खासदार म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती देत खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज दिनांक 12 जून 2023 रोजी पत्रकारांसमोर आपले प्रगती पुस्तक मांडले त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, राजेंद्र गावित उपस्थित होते.
नऊ वर्षाच्या काळात मोदी सरकारने केलेले कार्य आणि घेतलेले निर्णय सामान्य जनतेला न्याय देणारे कसे आहेत याविषयी थोडक्यात म्हणणे मांडून याप्रसंगी खा.डॉ.गावित म्हणाल्या, नंदुरबार लोकसभा मतदार संघात सन २०१४ ते २०२२ या काळात कोटयावधी रुपयांची विकास कामे करण्यात आली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आगामी काळात जिल्हयात १० हजार ५ कोटी रुपयांचे २७७.८९ किमीचे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रस्तावित आहेत. यात ५०० कोटी रुपये खर्चाच्या खेतिया-नंदुरबार-विसरवाडी-साक्री-पिंपळनेर राष्ट्रीय महामार्ग (५०.२० किमी), २१० कोटी रुपये खर्चाच्या खेतिया-शहाद-नंदुरबार-विसरवाडी-साक्री-पिंपळनेर (२१ किमी), १७५ कोटी रुपयंच्या राष्ट्रीय महामार्ग शेवाळी-निजामपूर-छडवेल-नंदुरबार-तळोदा-अक्कलकुवा ते गुजरात सिमाा, शेवाळी फाटा ते कळंभीर, निजामपूर महामार्ग (१६.६९ किमी), ९ हजार १२० केटी रुपये खर्चाचा धुळे-वडोदरा, राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील सोनगीर पासून ते वडफळी ता.अक्कलकुवा (सोनगीर-चिमठाणे-दोंडाईचा सारंगखेडा-शहादा-फत्तेपूर-दरा मोलगी-पिंपळखुटा-वडफळी व मध्यप्रदेशच्या सिमेपर्यंत (१९० किमी) या रस्त्यांचा समावेश आहे.
खासदार डॉ.हिना गावित पुढे म्हणाल्या, नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सन २०१४ पासून २०२२ पर्यंत यापुर्वी कधीही झालेेली नव्हती, एवढी कामे पूर्ण झाली आहेत. शहरी भागात २६ तर ग्रामीण भागात ४३ अशा एकूण ६९ मोबाईल टॉवर्सला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच नव्याने एकूण १४० टॉवर्सला मंजुरी मिळाली आहे. रेडीओ एफएम सुरु करण्यात आले आहे. अक्कलकुवा येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात नव्याने रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नंदुरबार रेल्वेस्थानक इमारतीला हेरिटेज लूक देऊन सदर इमारतीच्या नूतनीकरणासाठी २ कोटी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय महिला प्रतीक्षालय, बैठक हॉलचे बांधकाम, सीएमआय ऑफिस, पार्सल ऑफिस बांधकाम, वाढीव बोगद्याचे बांधकाम, दिव्यांगांसाठी नवीन शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहेत आदी २४ कोटी ७२ लाख ३४ हजार ६१३ रुपयांची कामे झाली आहेत.
खासदार डॉ.हिना गावित पुढे सांगितले, पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ रस्ते मंजूर करण्यात आले असून यासाठी ५४ कोटी ९४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील १४ रस्त्यांसाठी ११० कोटी १७ लाख ११ हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील सहा रस्त्यांसाठी १८ कोटी ३० लाख ६ हजार रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील पाच रस्त्यांसाठी २१ कोटी ९४ लाख ७१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील ६ रस्त्यांसाठी १९ कोटी ९२ लाख ७७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील नऊ रस्त्यांसाठी २८ कोटी ४ लाख ७३ हजार रुपयांच्या निधी, साक्री तालुक्यातील चार रस्त्यांसाठी २४ कोटी १९ लाख १४ हजार, शिरपूर तालुक्यातील चार रस्त्यांसाठी १९ कोटी १ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नंदुरबार तालुक्यातील पाच रस्त्यांसाठी ८८ कोटी ३९ लाख, तळोदा तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी २१ कोटी ४ लाख, नवापूर तालुक्यातील एका रस्त्यासाठी ४ कोटी ४६ लाख, शहादा तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी १६ कोटी ८६ लाख राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत विसरवाडी कोळदे खेतिया खेतिया रस्त्यासाठी महामार्गासाठी ५०९ कोटी १८ लाख, साक्री-शिर्डी रस्त्यासाठी २७७ कोटी ४२ लाख, शेवाळी-नंदुरबार रस्त्यासाठी १२० कोटी, मालेगाव-शहादा रस्त्यासाठी ३१ कोटी २ लाख, फागणे-विसरवाडी रस्त्यासाठी ११०० कोटी अशा २०३८ कोटी २ लाख रुपयांच्या महामार्गांना निधी मंजूर झाला आहे, असेही याप्रसंगी खासदार डॉक्टर गावित म्हणाल्या.