10 जानेवारीपासून हे नवे निर्बंध; शाळा-कॉलेज तूर्त बंद

मुंबई – राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याने राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार आता राज्यात 10 जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.

असे आहेत निर्बंध

  •  रात्री 11 ते सकाळी 5 कर्फ्यू
    मैदानं, उद्यानं पर्यटन स्थळ बंद
  •  शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
  •  थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
  •  सलून आणि खासगी कार्यलय 50 टक्के क्षमतेनं सुरु
  •  पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसनं वाहतूक करण्यास मुभा
  •  हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
  •  स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद
  • महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल, तर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआ चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक
  •  हॉटेल्स रेस्टॉरंटमध्येही पूर्ण लसीकरणं झालेल्यांनाच प्रवेश, होम डिलीव्हरी सेवा पूर्णवेळ सुरु राहणार
  •  एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा दिली जाईल
  •  24 तास सुरु राहणारी कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडली जाणार
  •  दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांच्या दोन्ही कोविड प्रतिबंधक लसी झालेल्या असणं बंधनकारक.
  •  लसीचे दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!