नंदुरबार – नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नवापुर तालुक्यातील खांडबारा येथे प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना आणि महिला मेळावा पार पडला. या मेळाव्यात 100 बालिकांच्या नावे खाते उघडून सुकन्या समृद्धी योजनेत सहभागी करून घेण्यात आले.
नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित, महाराष्ट्र महिला मोर्चा उपाध्यक्ष वर्षा भोसले, महिला मोर्चा नंदुरबार समनवयक स्वाती भामरे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस छाया देवांग, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच त्यांच्या समवेत व्यासपीठावर लोकसभा मतदारसंघ प्रमुख सविता जयस्वाल, बेटी बचाव बेटी पढाव च्या नवापूर अध्यक्ष शर्मिला गावित आणि अन्य मान्यवर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
याप्रसंगी प्रमुख भाषणात मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजनेचे महत्त्व सांगितले. दहा वर्षाच्या आतील सर्व लहान मुलींच्या नावे पोस्ट ऑफिस अथवा बँकेत हे खाते उघडायचे आणि दरमहा हजार रुपये भरायचे पाच वर्षानंतर त्यात जमा असलेल्या रकमेवर जवळपास सव्वातीन लाख रुपये व्याज सरकारकडून मिळते. म्हणजेच पाच वर्षानंतर पाच लाखाहून अधिक रक्कम त्या मुलीला मिळते पुढे त्या रकमेतून अशाच प्रकारची बचत करत गेल्यास मुलींचा शैक्षणिक खर्च भागवणे गरीब कुटुंबांना शक्य होईल मोदी सरकारने प्रत्येक गरीब कुटुंबासाठी आणि महिलांसाठी अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत त्याचा लाभ आपण घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुप्रिया गावित यांनी याप्रसंगी केले. महिला मोर्चा उपाध्यक्ष जयश्री अहिरराव आणि अन्य वक्त्यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघ प्रमुख सविता जयस्वाल यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच मोदी सरकार महिलांसाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. मेळाव्याला खांडबारा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आणि त्यांनी विविध योजनांचे महत्त्व समजून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश वाघ यांनी केले.
जयस्वाल यांनी सुकन्यांचे खाते उघडण्यासाठी पुरस्काराचीही रक्कम केली अर्पण
विशेष उल्लेखनीय हे आहे की, महिलांसाठी लागू झालेल्या सरकारी योजना आपल्या भागातील महिलांपर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी सातत्याने धडपडणाऱ्यानंदुरबार लोकसभा मतदारसंघ प्रमुख सविता जयस्वाल यांनी या महिला मेळाव्याचे आयोजन केले होते त्याचबरोबर शंभर परिवारातील मुलींना उपस्थित ठेवले होते. पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजनेला पात्र असलेल्या 100 मुलींची नोंदणी करून घेत त्यांचे पोस्ट ऑफिस द्वारे खाते उघडण्याची व्यवस्था स्वतः जयस्वाल यांनी पाहिली. त्या प्रत्येक मुलीच्या खात्यात म्हणजे 100 मुलींच्या खात्यात भरावयाची पहिली प्रत्येकी 1000 रुपयाची रक्कम त्यांनी स्वखर्चाने जमा केली. सविता जयस्वाल यांना आदिवासी सेवक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले असून त्याची रोख 25 हजार रुपये रक्कम त्यांना प्राप्त झाली होती. ती पुरस्काराची पूर्ण रक्कम त्यांनी या कामासाठी अर्पण केली. सविता जयस्वाल यांचे खांडबारा परिसरात याच प्रकारचे अन्या स्वरूपात मोठे योगदान आहे.