नंदुरबार : जिल्ह्यातील वृध्द साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने मानधन अदा करण्यात येते. मात्र, अनेक कलावंताचे हयातीचे दाखले उपलब्ध न झाल्यामुळे तसेच काही कलावंतांचे खाते असलेली बँक इतर बँकेत विलीन झाल्यामुळे, तर काही कलावंताचे बँकेचे तपशील चुकीचे असल्यामुळे त्यांना मानधन देण्यास अडचण येत आहे. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी कलावंतानी विहीत प्रपत्रात वैयक्तिक माहिती संचालनालयाच्या व्हॉट्सॲप क्रमांक 8424920676 तसेच संबंधित तालुक्यातील गट विकास अधिकारी यांच्याकडे 14 मार्च 2022 पर्यंत सादर करावी. विहित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास कलावंतांचे मार्च 2022 पासूनचे मानधन देण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी डी.जी. नांदगांवकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
0000