15 रेल्वेगाड्या रद्द, 35 गाड्यांच्या मार्गात बदल; तब्बल 14 दिवसांचा मेगाब्लॉक

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-कुर्डुवाडी सेक्शनमधील भाळवणी ते वाशिंबे स्थानकादरम्यान 26.33 किमीचे दुहेरीकरणाचे काम दि.14 ऑक्टोबरपासून सुरू केले जात आहे. यामुळे तब्बल 14 दिवस ब्लॉक घेतला जात असून सोलापूर विभागातून धावणा-या 15 गाड्या रद्द तर 35 गाड्यांच्या मार्गात बदल (मार्ग परिवर्तन) करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.
    या कामामुळे नॉन इंटरलॉकींगच्या कामकरिता ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येत आहे; असे या माहितीत म्हटले आहे. ब्लॉक घेण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या एक्सप्रेस गाड्या –
मुंबई-गदग, गदग-मुंबई, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर, मुंबई-लातूर, लातूर-मुंबई, मुंबई-बिदर, बिदर-मुंबई, म्हैसूर-साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी-म्हैसूर, नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड हैद्राबाद-हडपसर, बिदर-मुंबई, पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा यापूर्वीच ता. 17 ऑक्टोबरपर्यत रद्द करण्यात आली आहे. आता ता. 28 ऑक्टोबरपर्यत रद्द करण्यात आली आहे.
मार्ग बदल करण्यात आलेल्या एक्सप्रेस गाड्या –
00101 सांगोला-आर्दशनगर (दिल्ली) किसान रेल्वे ही कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावेल.
00109 सांगोला-मुजफ्फरपुर किसान रेल्वे कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावेल.
00123 सांगोला-शालीमार किसान रेल्वे कुर्डुवाडी, लातूररोड, परभणी, पूर्णा, अकोला बडनेरा मार्गे धावेल.
01201 लोकमान्य टिळक टर्मिनल-मदुराई रोहा, मडगॉव, मंगलूरू, शोरनूर, पालगट, ईरोड, तिरूच्चिराप्पल्लि कोट्टै मार्गे धावेल.
01202 मदुराई- लोकमान्य टिळक टर्मिनल तिरूच्चिराप्पल्लि कोट्टै, ईरोड, पालगट, शोरनूर, मंगलूरू, मडगांव, रोहा मार्गे धावेल.
02882 भुनेश्वर-पुणे वाडी, सोलापूर, कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावेल.
02881 पुणे-भुनेश्वर पुणे, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर, वाडी, मार्गे धावेल.
06340 नागरकोईल-मुंबई दिंडुक्कल, नामक्कल, ईरोड, पालगट, शोरनूर, मंगलूरू, मडगांव, रोहा, पनवेल, ठाणे मार्गे धावेल.
06339 मुंबई- नागरकोईल ठाणे, पनवेल, रोहा, मडगांव, मंगलूरू, शोरनूर, पालगट, ईरोड, नामक्कल,दिंडुक्कल, मार्गे धावेल.
06352 नागरकोईल-मुंबई तिरूच्चिराप्पल्लि, ईरोड, पालगट, शोरनूर, मंगलूरू, मडगॉव, रोहा, पनवेल, ठाणे मार्गे धावेल.
06351 मुंबई- नागरकोईल ठाणे, पनवेल, रोहा, मडगॉव, मंगलूरू, शोरनूर, पालगट, ईरोड, तिरूच्चिराप्पल्लि मार्गे धावेल.
08519 विशाखापट्टनम-एलटीटी विकाराबाद, नांदेड, मनमाड, इगतपुरी मार्गे धावेल.
08520 एलटीटी-विशाखापट्टनम इगतपुरी, मनमाड, नांदेड, विकाराबाद, मार्गे धावेल.
06229 म्हैसूर-वाराणसी रायचूर, सिकंदराबाद, बल्हारशाह, नागपूर, इटारसी मार्गे धावेल.
06230 वाराणसी- म्हैसूर इटारसी, नागपूर, सिकंदराबाद, रायचूर, मार्गे धावेल.
09054 अहमदाबाद-चैन्नई सुरत, जलगाव, भुसावळ, वर्धा, बल्हारशाह, सिकंदराबाद, रायचूर मार्गे धावेल.
09053 चैन्नई-अहमदाबाद रायचूर, सिकंदराबाद, बल्हारशाह, वर्धा, भुसावळ, जलगाव, सुरत, मार्गे धावेल.
09220 अहमदाबाद-चैन्नई सुरत, जलगाव, भुसावळ, वर्धा, बल्हारशाह, सिकंदराबाद, रायचूर मार्गे धावेल.
09219 चैन्नई-अहमदाबाद रायचूर, सिकंदराबाद, बल्हारशाह, वर्धा, भुसावळ, जलगाव, सुरत, मार्गे धावेल.
01017 एलटीटी-करिकल पुणे, मिरज, हुबळी, यंशवतपूर, जोलारपेट्टै, काटपाडी, वेलूर, विलूप्पुरम मार्गे धावेल.
01018 करिकल-एलटीटी विलूप्पुरम, वेलूर, काटपाडी, जोलारपेट्टै, यंशवतपूर, हुबळी, मिरज, पुणे मार्गे धावेल.
06502 यंशवतपूर-अहमदाबाद रायचूर, सिकंदराबाद, बल्हारशाह, वर्धा, जळगाव मार्गे धावेल.
06501 अहमदाबाद- यशवंतपुर जळगाव, वर्धा, बल्हारशाह, सिकंदराबाद, रायचूर मार्गे धावेल.
02755 राजकोट-सिकंदराबाद पुणे, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर मार्गे धावेल.
02756 सिकंदराबाद- राजकोट सोलापूर, कुर्डुवाडी, पुणे, मिरज मार्गे धावेल.
07204 काकिनाडा-भावनगर सोलापूर, कुर्डुवाडी, मिरज, पुणे, मार्गे धावेल.
07203 भावनगर- काकिनाडा पुणे, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर, मार्गे धावेल.
07221 काकिनाडा पोर्ट-एलटीटी सोलापूर, कुर्डुवाडी, मिरज, पुणे, मार्गे धावेल.
07222 एलटीटी- काकिनाडा पोर्ट पुणे, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर, मार्गे धावेल.
09016 इंदोर- लिंगमपल्ली पुणे, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर, मार्गे धावेल.
09015 लिंगमपल्ली-इंदोर सोलापूर, कुर्डुवाडी, मिरज, पुणे, मार्गे धावेल.
09120 केवडिया-चैन्नई पुणे, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर, मार्गे धावेल.
09119 चैन्नई- केवडिया सोलापूर, कुर्डुवाडी, मिरज, पुणे, मार्गे धावेल.
01302 बेंगलुरू-मुंबई उद्यान मुंबई स्थानकापर्यत धावण्याऐवजी सोलापूर स्थानकापर्यत धावेल.
01301 मुंबई- बेंगलुरू उद्यान मुंबई स्थानकावरून न सुटता सोलापूर स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!