नंदुरबार- मध्य प्रदेश राज्यातील खेतिया गावाकडून म्हसावदमार्गे धडगांव गावाकडे एक मालवाहू पिक वाहनाने अवैध विदेशी दारुची चोरटी वाहतूक होणार आहे; अशी खात्रीशिर बातमीदिनांक 9 ऑक्टोबर 2021 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना मिळाली. त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेशीत केले. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी एक पथक तयार केले. शहादा-म्हसावद धडगांव रोडवरील दरा गावाचे पुढे दबा धरुन बसले. रात्री पावणे नऊ च्या सुमारास म्हसावद गावाकडून वेगाने आलेल्या एका संशयित चारचाकी पिकअप वाहनाचा पाठलाग केला असता दरा गावाच्या पुढे काही अंतरावर वाहन चालकाने वाहन थांबवून तेथून पळ काढला. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात खाकी रंगाच्या खोक्त्यात 9 लाख 2 हजार 400 रुपये किमतीच्या मॅकडॉल्व नंबर रिझर्व व्हिस्कीच्या 180 एम.एल.चे एकूण 80 बॉक्स व त्यामध्ये 3840 सिलबंद काचेच्या बाटल्या, 3 लाख 30 हजार 400 रुपये किमतीच्या मॅकडॉल्व नंबर-1 रिझर्व व्हिस्कीच्या 750 एम.एल. चे एकूण 20 बॉक्स व त्यामध्ये 240 सिलबंद काचेच्या बाटल्या तसेच एक लोखंडी पितळी मुठ असलेली धारदार तलवार व 5 लाख रुपये किमतीचे एक महिंद्रा बोलेरो पिक अप वाहन क्रमांक MH-04 FJ-6867 असा एकूण 16 लाख 36 हजार 800 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार झालेल्या वाहन चालकाविरुध्द म्हसावद पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.