आजचा सुविचार:
॥ हरि ॐ तत्सत् ॥
खरे समजून घेणे :
सुनो सोचो समझो । सुनो समझो सोचो ।
भावार्थ : ‘सुनो’ म्हणजे ऐका, ‘सोचो’ म्हणजे विचार करा आणि ‘समझो’ म्हणजे समजून घ्या. पहिल्या ओळीत ‘सुनो सोचो समझो’ आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर मन आणि बुद्धी यांद्वारे विचार करून काय ते समजून घ्या. यातील समजून घेणे मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून असल्याने ते मायेच्या संदर्भात आहे. अभिमन्यूला केवळ हीच ओळ ठाऊक होती, म्हणून तो चक्रव्यूहात अडकला. याउलट दुसऱ्या ओळीत ‘सुनो समझो सोचो’ आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर जिवाने ती गोष्ट समजून जाणे, त्याची अनुभूती घेणे आणि नंतर त्याविषयी विचार करणे. हे ब्रह्माच्या संदर्भात आहे. – प.पू. भक्तराज महाराज.
(संदर्भ : प.पू. डॉ. आठवले संकलित सनातनचा ग्रंथ ‘प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण)