नंदुरबार – शहरात 2 हजार 400 नळ कनेक्शनच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे भरमसाठ पाणी वापरलेेे जात असताना, नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी कायम डोळे झाक केल्यामुळेच शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले व दोन दिवसाआड पाणी पुरवठ्याची अडचण सोसावी लागली; असा आरोप भारतीय जनता पार्टीचे गटनेते चारुदत्त कळवणकर यांनीी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेे यांच्या गटात एकीकडे प्रवेश घेतात आणि दुसरीकडे बॅनरवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा कशी काय लावतात? असा प्रश्न करून चाारुदत्त कळवणकर यांनी रघुवंशी यांच्यावर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा देखील आरोप केला.
नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पुरेसा पाणी साठा झाल्यामुळे येत्या 1 ऑगस्ट पासून पूर्वीप्रमाणे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय आज नंदुरबार नगरपालिकेत नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला; अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जाहीर केला. त्या अनुषंगाने प्रश्नांची सरबत्ती करीत चारुदत्त कळवणकर यांनी वरील आरोप केले आहेत. कळवणकर यांनी म्हटले आहे की, पाणी कपातीचा निर्णय असो की पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय असो; ते करतांना नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, इतर प्रमुख अधिकारी यांना तसेच नगराध्यक्ष, नगरसेवक यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन परस्पर जाहीर केले जातात. नगरपालिकेतील हा असा लोकशाही कारभार आहे काय? असा प्रश्न करून त्यांनी पुढे म्हटले आहे की,