नंदुरबार – परराज्यातील मद्य साठ्यासह 25 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने धडक कारवाई केली असून 2 जणांना अटक केली आहे.
अंकलेश्वर ते ब-हाणपुर रस्त्यालगत तळोदा तालुक्यातील आमलाड शिवारात हॉटेल सद्भावना समोर ही कारवाई करण्यात आली. यात दोन इसमाच्या ताब्यातुन परराज्यातील मद्य व दोन वाहनासह रू. २५ लाख ८३ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी देण्यात आलेली माहिती अशी की, दि. 05/12/2023 रोजी अंकलेश्वर ते बन्हाणपुर रस्त्यालगत आमलाड शिवार हॉटेल सद्भावना समोर पत्रीशेडमधे मद्य साठा ठेवण्यात आलेली गुप्त बातमी पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार डॉ. विजय सुर्यवंशी , आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, सुनिल चव्हाण, (द.अं) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, विभागीय उपायुक्त डॉ.बी.एच. तडवी, श्रीमती स्नेहा सराफ, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. त्यावेळी आमलाड ता. तळोदा जि. नंदुरबार येथे दोन वाहनात तसेच पत्रोशेडमधे परराज्यातील विदेशी मद्य व बियरचे एकुण २३३ बॉक्ससह एकुण रू. 25,83,920/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत करण्यात आली.
या कार्यवाहीत पी.जे. मेहता. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, श्री.बी.एस. महाडीक, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार, श्री पी.एस. पाटील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (अ) विभाग नंदुरबार, सा.दु.निरी. श्री.एम. के. पवार, जवान सर्वश्री, राहुल डो साळवे, हितेश पी जेठे, भुषण चौधरी, मानसिंग पाडवी, हेमंत पाटील, धनराज पाटील, संदीप वाघ यांचा समावेश होता. सदर गुन्हयाचा तपास श्री.पी.जे. मेहता. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करीत आहेत.