नंदुरबार – जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर जनतेसाठीच नव्हे तर पोलीस दलातील अमलदारांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून अत्यंत कमी वेळेत जनतेच्या आणि नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमंलदारांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

वर्षानूवर्षे पोलीस दलात परिश्रम करुन पोलीस अमंलदार आपल्या पदोन्नतीची वाट पाहत असतात. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पदोन्नती देणाऱ्या संबंधीत शाखेच्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना नंदुरबार जिल्ह्यातील पदोन्नतीस सेवाजेष्ठतेनुसार पात्र असलेल्या सर्व पोलीस अमलदारांना पदोन्नती देणेबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्याबाबतची सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करुन दिनांक 04/01/2022 रोजी नूतन वर्षात 53 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर व मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येस दिनांक 13/01/2022 रोजी 71 पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली. मकर संक्रातीच्या दिवशी पदोन्नती झाल्याने पोलीस अमंलदारांचा आनंद द्विगुणीत होवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील 53 पैकी 20 पोलीस अमलदारांना पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील मैदानावर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन कार्यक्रम आयोजीत करुन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्वतः पदोन्नती झालेल्या पोलीस अमंलदारांना पोलीस हवालदार पदाची फित लावून पोलीस अमंलदारांचे अभिनंदन केले व पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 53 पोलीसनाईक यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देऊन नवीन वर्षाची भेट व 71 पोलीस शिपाई यांना सेवा जेष्ठतेनुसार पोलीस नाईक पदावर पदोन्नती देऊन पोलीस अमलदारांना संक्रांत गोड केली आहे. तसेच यापूर्वी ही नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून 34 पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उप निरीक्षक पदी सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती दिलेले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील हे खऱ्या अर्थाने पोलीस अमलदारांच्या समस्या ऐकून त्याची तात्काळ अमंलबजावणी करत असतात अशी चर्चा सद्या पोलीस दलात केली जात आहे व त्याबाबत पोलीस अमंलदारांकडून समाधान व्यक्त होत आहे.
पोलीस हवालदार पदी पदोन्नती झालेल्या अमंलदारांची नावे :
राकेश भिकन वसावे, नामदेव भरत वसावे, तोरण दत्तू नाईक, उल्हास मधुकर टिंगळे, राजधर नथ्थु जगदाळे,  देवराम रामु गावीत, रितु शैलेश गावीत, शंकर उत्तम मालचे, विनोद उत्तम भिल, दिलीप टेंबऱ्या वसावे, सचिन झुलालसिंग राजपुत, राजु गणेश, इशराम रान्या नाईक, रतीलाल आवला पावरा, मधुकर कांड्या तडवी, किरण छगन वळवी, सुरेखा फुलसिंग वळवी, सुनिता यशवंत मावची, सरदार विद्या पटले, मनिषा मगन वळवी, शिवलाल गुंजाऱ्या पावरा, तुषार सुभाष सोनवणे, भरत झेंडू पाटील, लक्ष्मीकांत दगडु निकुंभ, भगतसिंग जयसिंग चव्हाण, सुरेश सिताराम कोकणी, दिपक सखाराम सोनवणे, परशराम सामल्या कोकणी, प्रविण विठ्ठल मोरे, रणजितसिंग तुकाराम वळवी, वनसिंग भोग्या पाडवी, गणेश नंदलाल नाईक, मनोज पितांबर साळुंखे, संजु जयसिंग पाडवी, रमिला सुहास वळवी, सुनिल यशवंत बच्छाव, दिनेशकुमार सुभाषचंद्र वसुले, भुषण विश्वासराव खंडारे, आसीफ गफ्फार शहा, सुनिल मधुकर येलवे, सदाशिव भिमाशंकर बोरकर, पुष्पेंद्र पुंडलीक कोळी, इंदु नान्या मावची, पंकज सुरेश पाटील, कल्पना गणेश पाटील, अनिल ठोबा पावरा, मनिषा रावजी गावीत, जगदिश वासू गावीत, हितेंद्र अरुण पाटील, छगन जत्र्या नाईक, सचिनकुमार बाबुराव पिपरे, दिलीप भिमसिंग तडवी, सुशिला मगन वळवी.
पोलीस नाईक पदी पदोन्नती झालेल्या अमंलदारांची नावे पुढील प्रमाणे :
काळुसिंग खाल्या वळवी, दत्तात्रय जिजाबराव बागल, काळुसिंग हुरजी पाडवी, देविदास तुळशीराम नाईक, प्रकाश मोहन सोनार, विनोद बाजीराव पराडके, गुलाब देवलू भवरे, सरवरसिंग गोट्या वसावे, प्रकाश परशुराम कोकणी, दिलवरसिंग पेचरा पाडवी, राजु फत्तेसिंग गावीत, सुरेंद्र उत्तम पवार, रजुला देवानंद वळवी, हितेश कातुंड्या वळवी,  पंकज प्रभाकर बडगुजर, ईस्मल कुसमुल पावरा, गणेश रायसिंग पाडवी, अनिता किसन वळवी, सुरेशा मानसिंग पाडवी, कांति रमण वसावे, कौशल्या सुरेश गावीत, संतोष दगडू भोई, हितेश भिका पाटील, अशोक इरमा वळवी, प्रताप मानजी वसावे, मंजु राजेश अहिरराव, अमरसिंग जयसिंग वसावे, शिवाजी काट्या वसावे, अजय अंबर गांगुर्डे, देविदास काशिनाथ गायकवाड, प्रदिप भिमसिंग वळवी, लालसिंग दामजा पाडवी, श्रीकांत वसंतराव गावीत, सुनिल निंबा चौधरी, अमोल वसंतराव आहेर, बापू भिका भाई, दिनेश प्रल्हादराव शिरसाठ, शिवाजी भामटा वसावे, दिनेश बांदीलाल वसावे, जयसिंग नोबल्या तडवी, अनुपमा रविकांत वसावे, मिलींद दिनकर बागुल, विजेंद्र नागराज वाडीले, सुनिल तुकाराम पवार, पांडुरंग जेत्र्या राऊत, दिलवरसिंग रतिलाल पावरा, ईश्वर सुका कोकणी, सैय्यद शरिफ हनिफ पिंजारी, हेमकांत हिरालाल कुमावत, निलेश रामचंद्र व्यवहारे, नरेंद्र लोटन पावरा, अभिसिंग बिजला पाडवी, हुमायुन शकिल पटेल, जितेंद्र देवराम सावळे, राजु बकाराम जगताप, जितेंद्र नामदेव चव्हाण, कैलास भाईदास तावडे, भटु शाम माळवे, कैलास रामदास बागुल, साहेबराव सदा जाधव, अरविंद सुपा पाडवी, शानाभाऊ पिरन ठाकरे, योगेश मंसाराम मोरे, सुभाष पांडुरंग पावरा, योगेश दौलत सोनवणे, नितेश दिनकर गावीत, मंगला खात्र्या पावरा, अविनाश रेवा कोकणी, राजेश्वर रामदास गावीत, विलास मगन पाटील, सुरेश राजेंद्र गावीत.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्वतः पदोन्नती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!