श्रीनगर – काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांचा मृतदेह पाकिस्तानी राष्ट्रध्वजात गुंडाळला असल्याने आणि त्या वेळी भारतविरोधी घोषणा देण्यात आल्याने गिलानी यांचे कुटुंबीय अन् अन्य लोक यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली आहे.
गिलानी यांचे १ सप्टेंबरला निधन झाले. त्यांचा मृतदेह जम्मू-काश्मीर पोलिसांनी दफन केला. पोलिसांनी गिलानी यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडून कह्यात घेतला. मृतदेह पाकिस्तानी राष्ट्रध्वजात गुंडाळला असल्याने आणि त्या वेळी भारतविरोधी घोषणा देण्यात आल्याने गिलानी यांचे कुटुंबीय अन् अन्य लोक यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘गिलानी यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात जमाव गोळा होऊन नंतर हिंसाचार भडकू शकतो, या कारणावरून त्यांचा मृतदेह पोलिसांनी कह्यात घेऊन दफन केला’, असे सांगण्यात येत आहे. गिलानी यांच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी भ्रमणभाष अन् इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ४ सप्टेंबरला रात्री ही सेवा पूर्ववत् करण्यात आली. त्यानंतर गिलानी यांचा मृतदेह पोलिसांनी कह्यात घेतल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला. तेव्हा ही माहिती उघड झाली.
एका व्हिडिओमध्ये गिलानी यांच्या मृतदेहाभोवती मोठ्या प्रमाणात लोक जमल्याचे दिसत होते. गिलानी यांचा मृतदेह पाकिस्तानी राष्ट्रध्वजात गुंडाळला होता. तेथे पोलीसही होते. त्यात त्यांना धक्काबुक्की झाल्याचेही दिसत आहे. याविषयी -काश्मीरचे जम्मू-क पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी, ‘देशविरोधी कारवाया करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत’, असे सांगितले.
———–