वाचंकांचं मत:
ही आहे सर्वपित्री अमावस्येची पौराणिक कथा..
प्रति ,
मा. संपादक
कृपया प्रसिद्धी साठी
सर्वपित्री अमावस्या नंतर श्राद्धपक्ष संपते त्यामुळे एक प्रकारे सर्व पितरांना या दिवशी ज्यांचे कोणाचे श्राद्धपक्ष काही कारणाने करायची राहिली असेल त्यांनी ही या दिवशी श्राद्ध पक्ष घातले तर त्यांनाही श्रद्ध पक्षा चे पुण्य मिळते
ज्यांच्या मृत्यूची तिथी लक्षात नसते किंवा असते अशा सर्व पित्रांचे या दिवशी श्राद्ध घालता येते.
याची एक अशी पौराणिक कथा आहे एकावेळी श्रीष्टी पुत्र अग्नि स्वाद व मानसि कन्या अक्षोदा यांनी खूप तपश्चर्या केली ती तपस्येत खूप तल्लीन झाली ती तपस्या करत असताना 1000 वर्ष संपले तरी त्याची तपस्या चालू होती तिच्या तपस्येने पितृलोक तेजस्वी होऊ लागला होता तेव्हा सर्व पित्र प्रसन्न होऊन वरदान देण्यासाठी तिच्या जवळ आले व म्हणाले कोणतेही वरदान माग पण अक्षदा ने पितृलोक कडे ध्यान दिले नाही ती त्यातील एक पित्र अमावस त्याच्याकडे पाहत राहिली तेव्हा पित्रा ने वेळोवेळी सांगूनही तिने वर मागितला नाही नंतर ती म्हणाली तुम्ही मला खरोखरच वरदान देणार आहात तर हे भगवान आपण जर मला वरदान देणार असाल तर हा वर द्या की मी आपल्यासोबत पितृलोकात राहू शकेल तेव्हा पित्रांना राग आला व ते म्हणाले आम्ही तुला श्राप देतो की तू पितृलोकातून जाऊन पृथ्वी वर जाशीत तेव्हा अक्षोदाला आपली चूक कळली व ती पित्राची क्षमा मागू लागली तेव्हा पित्राना तिची दया आली व त्यांनी सांगितले अक्षोदा तू मदश्य कन्या च्या रुपाने पृथवि वर जन्म घेशील व भगवान ब्रह्मा चे वंशज पराशर ऋषि तुला पतीच्या रूपाने मिळतील व तुझ्या पोटी भगवान महर्षी व्यास यांचा जन्म होईल त्यानंतर तू पुन्हा पितृलोकात येशील असे म्हटल्यावर अक्षोदा शांत झाली वतीने तो श्राफ स्वीकारला व नंतर ती पुन्हा परत गेली तेव्हा सर्व पित्राने तिचे स्वगत केले व पुत्र अमावस त्याची ही प्रशंसा केली एवढ्या सुंदर अक्षोदा तपस्वी ला पाहूनही तू तुझ्या मनाला भरकटू दिले नाही तेव्हा त्यानि आमवास याला वर दिला व सांगितले की आतापासून या तिथीला आमवास ही तिथी म्हटले जाईल व तेव्हापासून या तिथीला अमावस्या तिथि असे म्हटले जाते सर्वपित्री अमावस्या असेही म्हटले जाते कोणीही मनुष्य वर्षभर पितरांना काहीही करू शकत नसला तरी त्याने जर सर्वपित्री आमोशाला श्राद्ध पक्ष केले तर त्यांच्या पितरांना गती मिळून त्यांना पितरांचा आशीर्वाद मिळेतो अशी कथा आहे तरीही ज्यांचे कोणाची पित्रे राहिली असतील ते ह्या तिथीला घालू शकतात