नंदुरबार पोटनिवडणूकीत दुपारपर्यंत झाले पन्नास टक्केहून अधिक मतदान

नंदुरबार – येथील जिल्हा परिषदेच्या अकरा गटांच्या तसेच पंचायत समितीच्या १४ गणांच्या पोट निवडणूकीचे मतदान अद्याप शांततेत चालू असून दुपारी चार वाजेपर्यंतच्या माहितीनुसार 54 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

दरम्यान शहाद्यातील अदखलपात्र गुन्हा दाखल होण्याव्यतरिक्त कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी दिली. नंदुरबार तालुक्यातही आतापर्यंत शांततेत मतदान पार पडल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल पवार यांनी दिली. मतदान प्रक्रिया आणि कायदा-सुव्यवस्था या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नंदुरबार तालुक्यातील कोळदा, खोंडामळी,भागसरी येथील मतदान केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तथापि सर्वत्र जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी कडक बंदोबस्त ठेवला असून १००० पोलीस अधिकारी कर्मचारी व एस आर पी च्या दोन कंपन्या तैनात ठेवण्यात आले आहेत.

माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार डॉ.विजयकुमार गावित यांच्या कन्या तथा भाजपाच्या खासदार डॉ.हीना गावित यांच्या भगिनी डॉ.सुप्रिया गावित कोळदा जिल्हापरिषद गटातून उमेदवारी करीत असून त्यांचा या माध्यमातून राजकारणात प्रथमच प्रवेश होणार आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे चिरंजीव तथा ओबीसी आरक्षणामुळे ज्यांना जिल्हापरिषदेचे उपाध्यक्षपद सोडावे लागले ते ऍड.राम रघुवंशी कोपर्ली गटातून उमेदवारी करीत आहेत तर त्यांच्या विरोधात डॉ.विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित उमेदवारी करीत आहेत. त्याच बरोबर पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या पत्नी, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या पत्नी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ.सयाजीराव मोरे यांच्या स्नुषा अशा नव्या उमेदवरांच्या लक्षवेधी लढतींचे भवितव्य मतपेटीत बंद होत असून त्यामुळेच या मतदानाविषयी सर्वत्र उत्सूकता आहे.

स.७.३० ते ११.३० पर्यंत झालेले मतदान : –
स्त्री मतदान – ३५१०८
पुरुष मतदान -३७१५२
एकूण मतदान -७२२६०
*टक्केवारी* – २५.५९%*

दुपारी १.३० पर्यंत झालेले मतदान: –
स्त्री मतदान – ६०१५८
पुरुष मतदान -५९६२८
एकूण मतदान -१२०१४६
*टक्केवारी* – ४२.५५%

स.7.30 ते दु. 3.30 पर्यंत झालेले मतदान:-
स्त्री मतदान – 76378
पुरुष मतदान -76971
एकूण मतदान -153349
*टक्केवारी* – *54.30%*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!