नंदुरबार – शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये मेहतर वस्तीत महर्षी नवल स्वामी महाराज प्रवेशद्वाराचे भूमिपूजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन प्रसंगी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, गटनेता नगरसेवक चारुदत्त कळवणकर, नगरसेवक आनंद माळी, नगरसेवक प्रशांत चौधरी, नगरसेवक निलेश पाडवी, नगरसेविका संगीता सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, संदीप चौधरी, अशोक चौधरी, रामनभाई दुसेजा, मेहतर समाजाचे रमेशजी कडोसे, सुमित कडोसे, दिलीप हंडारे, नारायण तनवार, दीपक कडोसे, राम कडोसे, सुजित कडोसे, हेमंत जाधव, रमेश तेजी व मेहतर समाज बांधव उपस्थित होते.