शिवरक्षक जिवाजी महाले यांची 386 वी जयंती उत्साहात साजरी

     नंदुरबार –  नरवीर शिवरत्न जिवाजी महाले यांची 386 वी जयंती नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थे मार्फत आज शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
     नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आवारातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळेस जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य राम रघुवंशी यांचा नाभिक समाजामार्फत सत्कार करण्यात आला. जिवाजी महाले यांच्या जयंती निमित्त जिवाजी महाले यांच्या कार्याची माहिती पंकज भदाणे यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाला जिल्हा सचिव अरविंद निकम, उपाध्यक्ष हिमांशू बोरसे, सहसचिव शिवाजी मिस्त्री, प्रसिद्धीप्रमुख प्रकाश देवरे, संचालक नितीन मंडलिक, विजय सोनवणे, विजय सैंदाणे, नरेंद्र महाले, नंदुरबार तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिरसाट, तालुका उपाध्यक्ष भाईदास बोरसे, खोंडामळी अध्यक्ष राधेश्याम जाधव, तालुका सचिव राकेश अहिरे ,महिला जिल्हाध्यक्ष सौ मीनाक्षी भदाणे, कोषाध्यक्ष मनीषा निकम,सोनल बोरसे, कैलास सूर्यवंशी, यशवंत पवार, भटू निकम, तुळशीदास शिरसाट, देविदास शिरसाट, जयदेव शिरसाठ, मधुकर शिरसाट, हंसराज शिरसाट, मगन शिरसाट , गणेश शिरसाट,पांडुरंग मंडलिक, बिरारे नाना, महेंद्र चित्ते,त्यावेळेस मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!