नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यात दि. 3 ऑक्टोबर ते दि. 5 ऑक्टोबर 202 दरम्यान ऑपरेशन ऑल ऑऊट, कोंविंग ऑपरेशन, नाकाबंदी मोहिमेत चांगली कामगिरी बजावणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील 38 पोलीस अंमलदारांचा जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणूक 2021 व नवरात्रोत्सव दरम्यान समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत, यासाठी खबरदारी म्हणून नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यात दि. 3 ऑक्टोबर 2021 ते दि. 5 ऑक्टोबर 202 दरम्यान ऑपरेशन ऑल ऑऊट, कोंविंग ऑपरेशन, नाकाबंदी मोहिम राबविण्यात आली होती. त्या दरम्यान बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या विरुध्द् 1 गुन्हा, बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे 21 तलवार, 1 चाकू, 1 फायटर बाळगणाऱ्यांविरुध्द 3 गुन्हे, संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळून आलेले 11 रेकॉर्डवरील आरोपीसह वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपीना अटक तसेच 96 अजामीनपात्र वॉरंटमध्ये आरोपींना अटक, 61 जामीनपात्र वॉरंट, 78 हिस्ट्रीशीटर तपासण्यात आले तसेच नाकाबंदी दरम्यान 328 वाहनांची तपासणी करुन 195 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
या कारवाईमुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कौतुक केले गेले आणि या कौतुकाचे खरे हक्कदार यांचा गौरव केला पाहिजे म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 38 पोलीस अमलदार यांचा प्रातिनिधिक स्वरुपात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
गौरव करण्यात आलेल्या अमलदारांची नावे अशी:
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे अतुल बिन्हऱ्हाडे, भदु धनगर, उपनगर पोलीस ठाण्याचे अनिल सैंदाणे, नवापुर पोलीस ठाण्याचे विकास पाटील, दादाभाऊ वाघ, विश्वास साळुंखे, योगेश तनपुरे, विसरवाडी पोलीस ठाण्याचे दिलीप गावीत, किरण वळवी, शहादा पोलीस ठाण्याचे काळुराम चौरे, दिपक परदेशी, मेहरसिंग वळवी, रामा वळवी, किरण पावरा, भरत उगले, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस चुनिलाल ठाकरे, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे गोविंद जाधव, अमोल खवळे, कपिल बोरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे दिपक गोरे, महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, राकेश मोरे, जितेंद्र अहिरराव, दादाभाई मासुळ, मोहन ढमढेरे, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, जितेंद्र तोरवणे, विजय हिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे, शोएब शेख, किरण मोरे, यशोदिप ओगले, अभिमन्यु गावीत, रामेश्वर चव्हाण, राजेंद्र काटके या अमलदारांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सचिन हिरे तसेच प्रत्येक पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.