धुळे – शिरपूर शहरात ट्रॅव्हल्स एजन्सी चालवणारा 23 वर्षीय तरुण बेपत्ता झाला असून शिरपूर पोलिस ठाण्यात त्याविषयी नोंद झाली आहे. बेपत्ता होण्याचे कारण नेमके काय ? यावर विविध चर्चा रंगल्या आहेत व शिरपूर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शिरपूर शहरात करवंद रोड वरील श्री सिद्धिविनायक ट्रॅव्हल एजन्सीचे संचालक अशोक महाजन यांचा मुलगा प्रशांत अशोक महाजन हा बेपत्ता झाला आहे. शिरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी कार्यालयात जाऊन येतो असे सांगून घरून निघाला तथापि परत आला नाही. सर्व शक्यता तपासून पहात पोलीस शोध घेत आहेत. या घटनेला आर्थिक तणाव व दबाव कारणीभूत असावा आणि काही कर्ज प्रकरणांचा संदर्भ असावा का? या दिशेने देखील पोलीस तपास चालू असल्याचे समजते. दरम्यान बेपत्ता असलेल्या प्रशांत चे वडील अशोक महाजन यांनी सांगितले की, प्रशांत हा माझ्या सोबतच व्यवसायात लक्ष घालत होता व ट्रॅव्हल एजन्सीचे काम सांभाळत होता. तो स्वतः निघून जाईल असे कोणतेही कारण पुढे आलेले नाही त्यामुळेच आम्हाला या घटनेचा धक्का बसला आहे; असेही महाजन म्हणाले. छायाचित्रातील सदर व्यक्ती आढळल्यास 9423385698 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.