नंदुरबार : वनपट्टेधारक, वनदावेदारांनाही अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी ‘लोकसंघर्ष मोर्चा’ने शासनाकडे केली असून जिल्हा प्रशासनाला त्याचे निवेदन आज दि. १८ रोजी धडगांव तहसील कार्यालयात देण्यात आले. निवेदन दिले यावेळी मुकेश वळवी, नारायण पावरा, किसन पावरा यांच्यासह सायसिंग वळवी, बावा पावरा, महेंद्र मेटकर, आकाश पावरा,राकेश पावरा, बोख्या पवार, गरोख पावरा, कुशाल पटले, सुनील पटले, देवराम पटले, प्रफुल पराडके, दारासिंग पराडके, सुंड्या पराडके, सुभाष चंद्रे, शिवाजी झागळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यांच्या नावे दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने उत्तरमहाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मात्र ही नुकसानभरपाई फक्त 7/12 धारक शेतकऱ्यांनाच मंजूर केली आहे. वनपट्टे धारकांना व प्रलंबित आणि अपीलमधे असणाऱ्या दावे धारकांना नुकसान भरपाईचा उल्लेख नाही. हा आदिवासी शेतकऱ्यांवर अन्याय असून जमिनीचे मालक असूनही ह्या कायदेशीर हक्काला या मुळे अडचण येवू शकते.