नंदुरबार – येथील एक उपक्रमशील युवा कार्यकर्ते म्हणून सर्व परिचित असलेले माजी नगरसेवक दिलीप राघो बडगुजर यांची अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीची अंमळनेर येथे बडगुजर समाज मंगल कार्यालयात नवनियुक्त कार्यकारिणीविषयी नुकतीच महत्त्वपूर्ण सभा संपन्न झाली. मावळते अध्यक्ष माधवराव जानकीराम बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सर्वसंमतीने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी आनंदा धोंडू सूर्यवंशी धुळे, उपाध्यक्षपदी दिलीप राघो बडगुजर नंदुरबार ,सचिव हिरालाल रघुनाथ बडगुजर, सहसचिव भालचंद्र विठ्ठलराव साळुंखे, खजिनदार प्रकाश धुडकु बडगुजर, संघटक सुधीर तुळशीराम बडगुजर अशी निवड घोषित करण्यात आली. सचिव राजेंद्र बडगुजर यांनी प्रास्तविक तर ईश्वर बडगुजर यांनी आभार मानले.
उपाध्यक्षपदी निवड झालेले दिलीप बडगुजर हे 2003 पासून 2019 असे सलग 16 वर्षे नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळच्या अध्यक्षपदी होते. हे पद भूषवतांना समाजातील युवकांना व समाजबांधवांना संघटित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. तसेच अखिल भारतीय महासमितीचे ते 2011 पासून कार्यकारणी सदस्य, अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती अध्यक्ष म्हणून दहा वर्ष कार्यरत होते व बडगुजर शिक्षण संस्था धुळे बोर्डिंग येथे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.