नंदुरबार शहरात 11 लाख रुपयांचा गुटका तर लांबोळेजवळ 37 हजाराचा पानमसाला जप्त

नंदुरबार – शहरातील शाहूनगरात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडलेल्या वाहनातून 11 लाख रुपये किमतीचा विमल गुटखा जप्त केला. तर अन्न प्रशासन विभागाने केलेल्या दुसऱ्या निराळ्या कारवाईत 10 लाखाच्या ट्रकसह 37 हजार रुपयांचा पानमसाला जप्त केला.
शहादा तालुक्यातील लांबोळा गावाजवळ अन्न सुरक्षा व औषध प्रशासन अधिकारी किशोर हिमंतराव बाविस्कर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टाटा कंपनीच्या MH-१८ BG-७२३८ क्रमांकाच्या मालट्रकची तपासणी केली. तेव्हा महाराष्ट्र शासनाची अधिसुचना क्र. असुमाण / अधिसुचना ५००/७ दि. १५ जुलै २०२१ नुसार विक्री साठा, वितरण, वाहतुक व उत्पादन करण्यासाठी प्रतिबंधीत केलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखु ई. अन्नपदार्थ मालट्रक मध्ये विक्रीसाठी वाहतूक करतांना आढळून आला. म्हणून जुबेर शेख मेहबुब वय- ३१ रा. वार्ड क्र. ५ वरवाडे शिरपुर जि. धुळे याच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.  ३७ हजार ८४० रु. कि. केसर युक्त विमल पानमसाल्याचे १३२ व V-१ तंबाखुचे ४२८ असे एकूण ५६० पाऊच. १०,००,००० रु कि.ची मालट्रक असा 10 लाख 37 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास  पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे करीत आहेत.
दुसरी मोठी कारवाई नंदुरबार शहरात शाहू नगरातील खंडेराव मंदिराजवळ करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने MH ३९ AD ०१५५ क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो गाडीची संशयावरून झाडाझडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला व मानवी जिवीतास हानीकारक असलेला विमलपान मसाला व्ही १ तंबाखु वाहतूक करतांना आढळला. म्हणून लगेचच अटक करून उपनगर पोलिस ठाण्यात पोलिसशिपाई आंनदा पावबा मराठे यांच्या फिर्यादीवरून विक्की चंद्रेशकुमार शर्मा वय २७ रा- जुनी सिंधी कॉलनी नंदुरबार आणि राकेश सुरेश जाधव वय ३६ रा. संभाजी नगर बँकेसमोर, तळोदा रोड, नंदुरबार या दोघांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला. यात ११ लाख २८ हजार ८० रु किमतीचा विमलपान मसाला आणि व्ही १ तंबाखुच्या एकूण १० हजार ५२० नग पुडया ४ लाख रु कि. महिंद्रा बोलेरो सह जप्त करण्यात आल्या. अधिक तपास पोसई वाय एस भदाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!