नंदुरबार – येथील जिल्हा रुग्णालय परिसरात नुकत्याच सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या निवासासाठी वसतिगृह आणि उपहारगृह सुरू करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची भेट घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र राज्यातून व राज्या बाहेरून विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येत आहेत. मात्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासासाठी वसतिगृह उपलब्ध केलेले नाही. उपहारगृह देखील उपलब्ध केलेले नाही. अशा अनेक समस्यांना विद्यार्थी तोंड तोंड देत आहेत. यावर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याशी चर्चा केली. यावेळी अभाविपचे नंदुरबार शहरमंत्री जयेश सोनवणे, तालुका प्रमुख निखिल महाजन, प्रेम माळी, शुभम स्वामी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.