नंदुरबार – येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांची नंदुरबार व नवापर विधानसभा क्षेत्र जिल्हाध्यक्षपदी पुनश्चः नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक उपक्रम व पक्ष कार्यक्रम राबवून मनसेचे संघटन मजबुत केले. मनसेचे पक्ष निरीक्षक विनय भोईटे यांनी सहा जिल्ह्यांमधील जिल्हाध्यक्षांच्या कामाचा आढावा घेवून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्या आधारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षीय कार्याची दखल घेत मनसेच्या नंदुरबार व नवापूर विधानसभा क्षेत्र जिल्हाध्यक्षपदी विजय विश्वनाथ चौधरी यांची पुनश्चः नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील नियुक्तीपत्र राज ठाकरे यांनी विजय चौधरी यांना दिले. याप्रसंगी आ.बाळा नांदगावकर, आ.राजु पाटील, पक्ष निरीक्षक विनय भोईटे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, ऋषी चौधरी आदी उपस्थित होते.