भारताने गाठला 100 कोटी लसीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा;  देशातील 100 स्मारक तिरंगी रोषणाईने झगमगले

नवी दिल्ली –  भारताने 100 कोटी लसीकरणाचा  महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल संस्कृती मंत्रालयाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण देशभरात 100 स्मारके तिरंगी रोषणाईने झळाळून टाकला आहे. कोविड महामारीविरूद्धच्या लढाईत अथक योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांबद्दल आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक  म्हणून ही रोषणाई केली जात  आहे.

लसीकरणाने विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यात आणि तिसरी लाट थोपवण्यात महत्वाची भूमिका बजावली असून  100 कोटी कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देऊन अब्जावधी मात्रा देणाऱ्या देशांमध्ये  चीनसह भारत हा एकमेव देश आहे .

तिरंगी रोषणाईने न्हाऊन निघालेल्या 100 स्मारकांमध्ये युनेस्कोच्या पुढील जागतिक वारसा स्थळांचा समावेश आहे – दिल्लीतील लाल किल्ला, हुमायूनचा मकबरा आणि  कुतुबमिनार, उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ला आणि फतेहपूर सीकरी, ओडिशामधील कोणार्क मंदिर, तामिळनाडूतील ममल्लापुरम रथ मंदिरे, गोव्यातील सेंट फ्रान्सिस  असीसी चर्च, खजुराहो, राजस्थानमधील चित्तोड  आणि कुंभलगडचे किल्ले, बिहारमधील प्राचीन नालंदा विद्यापीठाचे खोदलेले अवशेष आणि गुजरातमधील धोलाविरा (अलीकडेच जागतिक वारसा दर्जा प्राप्त ).

Sun Temple, Konark

Red Fort

Khajuraho

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!