लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाल्यानिमित्त नंदुरबार जिल्हा भाजपा करणार विविध सन्मान 

     नंदुरबार – लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाल्यानिमित्त नंदुरबार जिल्हा भाजपाच्या वतीने विविध सन्मान करणारे कार्यक्रम आणि विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली.
या माहितीत त्यांनी सांगितले की देशात 100 कोटी लसीकरण करून भारताने जागतिक विक्रम केला आहे. यानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील  खासदार, आमदार, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मोर्चा व आघाडी अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक, जि प सदस्य, प स सदस्य, सभापती आप-आपल्या स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. यात सर्व लसिकरण केंद्र , तसेच गाव, मंडल, जिल्हा स्तरावर कोरोना योध्दे, डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता कर्मचारी तसेच पोलीस व अन्य सुरक्षा सेवकांना सन्मानित करणे, कोविड-19 काळात सेवा व मदत कार्य केलेल्या समाजसेवकांचा पक्ष कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मान व सत्कार करणे, लसीकरण केंद्रांवर पाणी, बिस्कीट, सरबत व फळ वाटप करुन सेवा कार्य करावे. गरीब वृद्ध व गरजू लोकांना मार्गदर्शन व सहकार्य तसेच केंद्रावर ने-आण करण्याची व्यवस्था करणे, रविवार 24 ऑक्टोबर पर्यंत सर्व गावे /शहरात 18 वर्षा वरिल सर्वांचे 100% लसीकरण पूर्ण करण्या करिता मोहीम राबवणे ज्यामुळे जनतेला व युवकांना समाजसेवेची प्रेरणा मिळेल असे कार्यक्रम उपक्रम राबवलेे जाणार आहेत, अशी माहिती विजय चौधरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!