धुमाकूळ घालणाऱ्या विरोधी नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा; नंदुरबार नगराध्यक्षांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नंदुरबार – भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविकेच्या मुलावर तसेच त्या नगरसेविकेवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारा ठराव करीत सत्ताधारी गटाच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्यासह जाऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील ही तक्रार मांडली. असंसदीय वर्तणूक करणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
 नंदुरबार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात असभ्य वर्तवणूक करुन खुर्च्या तोडून नगरसेविकेच्या मुलाने व त्या नगरसेविकेने दहशत बसवण्याचा प्रकार केला; असा काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांचा आरोप आहे. याविषयी आज दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी नंदुरबार नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी ठराव करण्याची मागणी केली. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार नगरपरिषदेच्या कार्यलयात विरोधी पक्षाचे नगरसेवक कार्यालयीन वेळेत कार्यालयात येवून धुमाकुळ घालत असतात. यापूर्वी सुध्दा नंदुरबार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश गिरी असतांना नगरसेविकेचे पुत्र लक्ष्मण माळी व विरोधी नगरसेवक यांनी खुच्र्यांची नासधुस केली होती. आताही दि. 20 ऑक्टोंबर, 2021 रोजी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत नगरसेविकेचा पुत्र लक्ष्मण माळी व इतर नगरसेवकांनी खुर्च्या तोडून आरडा-ओरड केली व शिवगाळ केली. संपूर्ण नगरपरिषद या घटनेची साक्षीदार आहे असे आम्हाला वाटते. तसेच मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे हे सुध्दा याघटनेचे साक्षीदार असुन त्यांच्या दालनातील तसेच नगरपालिकेतील सी.सी.टी.व्ही. कॅमेरातुन सुध्दा याघटनेचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही. तरी आम्ही आपल्याला विनंती करतो की, नगरपरिषदेमध्ये शिवीगाळ करणाऱ्या, दादागरीची भाषा करणाऱ्या सिंधुताई माळी, त्यांचा मुलगा लक्ष्मण माळी तसेच नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घ्यावा व असभ्य वर्तवणूक करणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व कमी करण्यासाठी म. जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करावा. नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी लगेचच हा ठराव मंजूर करून जिल्हाधिकारी यांची नगरसेवकांसमवेत जाऊन भेट घेतली. उपनगराध्यक्ष रवींद्र अशोक पवार, प्रमोद ओंकार शेवाळे, मेमन मनसा अगली,  कुरेशी फहमीदा बानो दियाम, परवेज कर करामत खान यांच्याासह सत्ताधारी गटातील नगरसेवकांच्या स्वाक्षरी त्यावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!