(एनडीबी न्यूजवर्ल्ड वृत्तसेवा)
नंदुरबार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द काढले म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उग्र आंदोलन करीत केंद्रीय मंत्रि नारायण राणे यांचा निषेध नोंदवला. यात तळोजा येथे पुतळा दहन करण्यात आले तर नंदुरबार येथे धिक्कार करणाऱ्याा घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली.
तळोदा शहरातील प्रमुख चौकात मंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करतांना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना तीनही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे, उप जिल्हा प्रमुख सोमु राजपूत, उपजिल्हा प्रमुख रुपसिग, तालुका प्रमुख प्रकाश कुलकर्णी, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, शहर संघटक विनोद वंजारी, युवा सेना तालुका प्रमुख कल्पेश सुर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पटेल, माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन, सुरज माळी, श्रावण तजविज, काशिनाथ कोळी, विजय मराठे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश मराठे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप परदेशी कॉग्रेस चे नगर सेवक हितेंद्र क्षत्रिय यांचा समावेश होता.