नंदुरबार – नगरपरिषदेच्या नूतन वास्तूच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. यावेळी अधिकारी व ठेकेदार यांना सूचना करण्यात आल्या. सध्या बांधकाम प्रगतिपथावर आहे.
मागील निवडणुकीत माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी यांनी जाहीरनाम्यात नगरपरिषदेची भव्य वास्तू बनवण्याच्या संकल्प केला होता. गतवर्षी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन केले होते. या इमारतीत नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,विविध विषय समिती सभापती व विरोधी पक्षनेते,मुख्याधिकारी त्याचप्रमाणे विभागनिहाय स्वतंत्र दालन असणार आहे. खानदेशात पालिकेची देखणी इमारत असेल असा विश्वास माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, शिवसेना कार्यकर्ते देवेंद्र जैन, शेतकी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे,अभियंता किरण तडवी, ठेकेदार बाळासाहेब भदाणे,अशोक राजपूत, फारूक मेमन,फरीद मिस्तरी,अनिल पाटील तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.