नंदुरबार- सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत तथापि त्या अडचणी त्वरीत सोडवू तसेच शक्य त्या मागण्यांची पूर्तता देखील करू; असे आश्वासन नुतन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार कल्याणकारी सेवाभावी संघटनेच्या शिष्टमंडळास दिले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेवून चर्चा केली त्याप्रसंगी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी शिष्टमंडळास हे आश्वासन दिले.
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निवृत्ती योजनेचा लाभ मिळावा आणि अडचणी सोडविल्या जाव्यात, यासाठी नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार कल्याणकारी सेवाभावी संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे. तथापि त्या प्रलंबित राहत आहेत. त्या संदर्भाने संघटनेच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने नंदुरबारचे नुतन पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांची भेट घेतली. सेवानिवृत्त वेतन, ग्रज्युईटी, पेन्शन विक्री, रजा रोखीकरण आदी योजनांच्या लाभापासून नंदुरबार जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी वंचित असल्याची माहिती संंघटनेने दिली. याप्रसंगी पोलीस उपअधिक्षक विश्वास वळवी यांचा संघटनेकडून सत्कार करण्यात आला.
संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठाकुर, उपाध्यक्ष रमेश खवळे, सचिव जगन्नाथ जगदाळे, संचालक रऊफ शाह, प्रदिप पाटील, साहेबराव सैंदाणे, सदस्य प्रकाश राणे, सदाशिव शिरसाळे, केसरसिंग क्षत्रिय, काशिनाथ जाधव, संभाजी सोनवणे, सरीचंद पवार, प्रभाकर बागल, विनोदसिंग राजपूत आदी उपस्थित होते.