नंदुरबार – ट्रॅव्हल्स बस एजन्सीकडून चाललेली मनमानी मोडून काढत राज्याच्या परिवहन विभागाने राज्यभरातील प्रवाशांना सुखद धक्का दिला असून सर्व ट्रॅव्हल्स बससाठी म्हणजे खाजगी कंत्राटी बसेससाठी कमाल भाडे दर निश्चित करून दिले आहेत. ते दर पत्रक प्रत्येक ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयात जाहीरपणे लावणे बंधनकारक करण्यात आले असून यामुळे प्रवाशांकडून होणाऱ्या ज्यादा भाडे आकारणीला पायबंद बसू शकणार आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की सध्या सणासुदीचे दिवस सुरू होत असल्याने राज्यातील प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात खाजगी कंत्राटी बसेसचा वापर करण्यात येतो. अशा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून खाजगी कंत्राटी वाहतुकीची ने-आण करणाऱ्या वाहतुकदारांकडून गर्दीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. अश्या खाजगी कंत्राटी वाहनांच्या भाडेदरासंदर्भात उच्च न्यायालय, मुंबई येथे जनहित याचीका क्र.१४९/२०११ दाखल करण्यात आली होती. त्या याचीकेत उच्च न्यायालयाने खाजगी कंत्राटी वाहनांचे भाडे निश्चीत करण्याचे आदेश शासनास दिले होते.
त्याअनुषंगाने राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचे संपूर्ण बससाठी प्रति किलोमीटर भाडेदर त्याच स्वरुपाच्या महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती किलोमीटर भाडेदराच्या ५० % पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेवर महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक एमडीव्हीआर-०४१२/प्र.क्र.३७८/( पु.बां.०७)/परि २ दि.२७.०४.२०१८ अन्वये निश्चीत करण्यात आले आहे.
राज्य परिवहन प्राधीकरणाने एस.टी. महामंडळाच्या प्रवासी बसेसकरीता असलेल्या भाडेदरामध्ये १७.१७% वाढ केली आहे. नंदुरबार शहरातून खाजगी बसेस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात.
- या कार्यालयाद्वारे खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवाश्यांकडून किती भाडे आकारावे याबाबतचा तक्ता तयार करून प्रवाश्यांच्या सोयीकरीता प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स कंपनी यांचे कार्यालयात फलक माहीती लावणेबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रवाश्यांच्या माहीतीकरीता सदर तक्त्यात प्रती प्रवासी वाहनाच्या प्रकारानुसार खाजगी बसेसकरीता माडेदर निश्चीत करण्यात आलेले आहे.
- त्याचप्रमाणे कोणत्याही खाजगी वाहतुकदाराकडून (खाजगी ट्रॅव्हल्स) कंपनीकडून महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचे शासन निर्णय अन्वये निश्चीत केलेल्या भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारणी केल्याबाबत तक्रार असल्यास ती mh39@rmahatranscom.in व dyeommr.enfr@@gmail.com या संकेतस्थळावर करावी.
अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधीत वाहतुकदार यांच्यावर मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कारवाई करण्यात येईल याबाबत सर्व नागरिकांना व खाजगी ट्रॅव्हल्स वाहतूकदार यांनी नोंद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी आवाहन केले आहे.
असे आहेत निश्चित केलेले भाडे दर :


